भंडारा - जिल्ह्यात मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरवात झाली. मात्र, काही बूथवर 10 मिनिटे उशीरा मतदानाला सुरवात झाली आहे.
भंडारा जिल्ह्यात भंडारा विधानसभा, तुमसर विधानसभा, साकोली विधानसभा अशा तीन विधानभेसाठी मतदान होत असून 9 लाख 91 हजार 890 मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बाजाविणार आहेत 1 हजार 206 मतदान केंद्रावर हे मतदान सुरू आहेत. मतदान सुरळीत व्हावे यासाठी 5 हजार 202 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 2 हजार 375 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. तर जिल्ह्यात 19 संवेदनशील मतदान केंद्र असून 7 सखी आणि 7 आदर्श मतदान केंद्राची निर्मिती केली असून 125 मतदान केंद्रावर वेब कास्टिंग होणार आहे.