भंडारा - जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातिल परसोडी/नाग येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील दरोड्याचा प्रयत्न फसला आहे. दरोडेखोरांनी बँक इमारतीच्या मागील भिंतीवरील लोखंडी खिडकी तोडून बँकेत प्रवेश केला. तब्बल अडीच तासानंतरही तिजोरी फोडण्यात अपयश आल्याने केवळ संगणकाचे मॉडेम चोरून नेले. याबाबत अज्ञातांविरोधात लाखांदूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. श्वानपथकाद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्यात यश मिळले नाही. ही घटना मंगळवारी (दि. 10 मार्च) रात्री घडली आहे.
खिडकीमार्गे शिरले दरोडेखोर
परसोडी /नाग येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकामध्ये मध्यरात्री 11:53 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात दरोडेखोरांनी बँकेत दरोडा टाकण्याच्या हेतूने खिडकी तोडून बँकेत प्रवेश केला. या दरोडेखोरांनी शाखा व्यवस्थापकाच्या कक्षातून प्रवेश केल्याने लगेच सायरन वाजले. यावेळी सायरनच्या आवाजाने घाबरुन संबंधित बँकतील संगणक मॉडेम निकामी केले. तो मॉडेम निकामी झाल्यानंतर या दरोडेखोरांनी बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिजोरी फोडण्यात अपयश आल्याने तब्बल अडीच तासानंतर पहाटे 2:46 वाजता दोन्ही दरोडेखोर घटना स्थळावरून पसार झाले. हा घटनाक्रम बँकतील सीसीटीव्हीत कैद झाला असून दरोड्यासाठी दोन तरुण आत आल्याचे दिसत आहे.
सकाळी आली घटना उघडकीस
ही घटना रात्री घडल्यामुळे या घटने विषयी कोणालाही समजले नाही. सकाळी बँकेची खिडकी तोडलेल्या अवस्थेत काही नागरिकांना दिसली त्याची माहिती बँक कर्मचाऱ्यांना आणि लाखांदूर पोलिसांना दिल्यानंतर बँक कर्मचारी व लाखांदूर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. बँकेची तपासणी केली असता अज्ञात दरोडेखोरांनी केवळ संगणक मॉडेम चोरल्याचे आढळून आल्याने बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
हात मोजे अन् मास्क आढळला
पोलिसांनी अधिक तपास केले असता त्यांना त्यांना इमारतीच्या काही अंतरावर हात मोजे व मास्क आढळून आले. भंडाऱ्यावरून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. या श्वानाने अर्ध्या किलोमीटरपर्यंत मार्ग दाखविला. मात्र, तो तिथेच थांबला. सध्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी साकोली तालुक्यातील सानगडी गावात तब्बल 80 लाखांचा दरोडा पडला होता. या दरोड्यातील आरोपी पकडण्यात पोलिसांना अजूनही यश मिळाले नाही.
हेही वाचा - 'आई मला माफ कर, तुझी लाडकी...' पत्र लिहून क्लासवन महिला अधिकाऱ्याची आत्महत्या
हेही वाच - विशेष : दैनंदिन जीवनात आईचे महत्त्व वाढविण्यासाठी अंगणवाडी सेविकांचा अनोखा उपक्रम