भंडारा - पवनी येथील मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांना 23 डिसेंबर 2017 रोजी पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात वीर मरण आले होते. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी संपूर्ण जिल्हा एकवटला होता. राजकीय नेते देखील श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या घरी उपस्थित झाले होते. त्यावेळी पवनीचे आमदार रामचंद्र अवसरे आणि नगराध्यक्षांनी प्रफुल्ल मोहरकर यांचे कार्य सदैव पवनीच्या नागरिकांना लक्षात राहावे तसेच तरुणांनी प्रेरणा घेऊन देशसेवेसाठी जावे या हेतूने पवनी मध्ये स्मारक निर्मितीची घोषणा केली. मात्र मागच्या दोन वर्षात शहीद स्मारक बनलेले नाही.
स्मारक निर्मितीची घोषणा झाल्यामुळे पालिका प्रशासनाने शहीद मेजर प्रफुल यांचे अस्थिकलश कुटुंबीयांकडून प्राप्त करून घेतले आणि त्यास मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात ठेवले. मात्र, वर्षभरात प्रशासनाने स्मारक उभारण्यासाठी सुरुवातही केली नाही. त्यामुळे, अखेर कुटुंबीयांनी अस्थिकलश नगरपालिकेकडून परत मिळवला आणि विधीवत त्याचे विसर्जन केले. या प्रकारामुळे प्रशासन खडबडून जागे होईल आणि वर्षभरात स्मारक उभे करेल, अशी अपेक्षा सर्वांची होती. मात्र, शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकरांचे दुसरे पुण्यस्मरण आले आहे तरीदेखील प्रशासनाला स्मारकाचा विसरच पडल्याचे चित्रे आहे. स्मारकाच्या जागेवर केवळ भूमिपूजनच झालेले आहे.
कुऱ्हाडा तलावाच्या पारीवर साठ लाखाचे स्मारक आणि सैन्य भवन बनणार होते. यासाठी तत्कालीन आमदारांनी 21 लाख रुपयांचा नीधी मंजूर केला होता. शिवाय पवनी नगरपालिकेने विशेष योजनेद्वारे अधिकची रक्कम शासनाकडून मंजूर करून घेतली. स्मारकाची जागा निश्चित झाली. कामाचे कंत्राट देखील निघाले. सुरुवातीला या स्मारकासाठी शासनातर्फे 48 लाख रुपये मंजूर झाले आहेत. मात्र या सर्व बाबतीत संपूर्ण वर्ष वाया गेले. सप्टेंबर महिन्यात या स्मारकाच्या जागेवर भूमिपूजनही करण्यात आले. मात्र त्या जागेवर काही अतिक्रमण असल्याने बांधकामाला प्रत्यक्षात अजूनही सुरुवात झालेली नाही.
याविषयी नगराध्यक्ष पुनम काटेखाये यांना विचारले असता, आमदारांनी दिलेली रक्कम अपुरी असल्याने अधिकची रक्कम मिळविण्यात उशीर झाला. त्यानंतर आता असलेल्या नियोजित जागेवर अतिक्रमण आहे. अतिक्रमण काढल्यानंतर बांधकामाला सुरुवात होणार आहे. अतिक्रमणधारक लोकांना दोन दिवसाची मुदत दिली गेली असून त्यांनी ही जागा न सोडल्यास पालिकेद्वारे अतिक्रमण तोडण्यात येईल आणि येत्या आठवड्यात काम सुरू करण्यात येईल, सांगितले.
दरम्यान, माझ्या मुलाच्या नावाने स्मारक उभारण्यात यावे, अशी आम्ही मागणी केली नाही किंवा तशी अपेक्षाही नाही. मात्र, या स्मारकामुळे या भागातील तरुणांना देशसेवेसाठी जाण्यास प्रेरणा मिळत असेल तर असे स्मारक नक्कीच बनले पाहिजे, अशी भावना शहीद मेजर प्रफुल मोहरकर यांच्या आईने व्यक्त केली.
बाईट : पूनम काटेखाये, नगराध्यक्ष, पवनी
रवींद्र ढोके, मुख्याधिकारी, पवनी नगर पालिका
शहीद आई,
Conclusion: