ETV Bharat / state

पाण्यात वाहून जाणारे दोन शिक्षक थोडक्यात बचावले, कार पाण्यात वाहून गेली

सोमवारी सकाळपासूनच साकोली तालुक्यातील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस बरसला. करडी रस्त्यावरील चांदोरी गावातील नाल्यावर त्यामुळे पूर आला. तरीही साकोलीच्या ब्रम्हानंद करंजेकर फार्मसी महाविद्यालयाच्या दोन शिक्षकांनी या पुलावरून स्विफ्ट गाडी काढण्याचा प्रयत्न केला.

पाण्यात वाहून जाणारे दोन शिक्षक थोडक्यात बचावले
author img

By

Published : Sep 3, 2019, 8:06 AM IST

Updated : Sep 3, 2019, 8:56 AM IST

भंडारा - साकोली तालुक्यातील चांदोरी गावाच्या पूर आलेल्या नाल्यावरून चार चाकी गाडी काढण्याचा प्रयत्न करताना स्विफ्ट कार वाहून गेली. मात्र, कारमध्ये असलेल्या शिक्षकांचे दैव बलवत्तर होते म्हणून दोन्ही शिक्षकांचे प्राण वाचले. महाविद्यालय संस्थापकाच्या जनसंपर्क प्रचारासाठी हे शिक्षक गेले होते.

सोमवारी सकाळपासूनच साकोली तालुक्यातील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस बरसला. करडी रस्त्यावरील चांदोरी गावातील नाल्यावर त्यामुळे पूर आला. तरीही साकोलीच्या ब्रम्हानंद करंजेकर फार्मसी महाविद्यालयाच्या दोन शिक्षकांनी या पुलावरून स्विफ्ट गाडी काढण्याचा प्रयत्न केला. देवचंद चांदेवार व मुनेश्वर अशी या सहाय्यक शिक्षकांची नावे आहेत.

पाण्यात वाहून जाणारे दोन शिक्षक थोडक्यात बचावले

हेही वाचा - पवनीमध्ये भरला आधुनिक ट्रॅक्टर पोळा

शिक्षकांनी स्विफ्ट गाडी पुलावर घातली. मात्र, पाण्याचा वेग एवढा जास्त होता, की गाडी पुलावरून खाली कोसळत पाण्याच्या प्रवाहात वाहत निघाली. गाडी पुलावरून कोसळत असतानाच एका शिक्षकाने गाडीच्या बाहेर उडी घेतली. त्यामुळे तो सुखरूप बाहेर निघाला. मात्र, दुसरा शिक्षक त्या गाडीत असल्याने गाडीसह तोही वाहत होता. प्रसंगावधान साधून त्या शिक्षकाने पाण्यात उडी घेत एका झाडाचा आधार घेत स्वतः चे प्राण वाचवले. गावकऱ्यांना माहिती होताच त्यांनी नाल्याच्या दुसऱ्या बाजूने दोर घालत त्या शिक्षकाला सुखरूप बाहेर काढले.

हेही वाचा - भंडारा जिल्ह्यात बाप्पासह पावसाचेही आगमन, भक्तामध्ये उत्साह

पुढच्या काही दिवसात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत साकोलीच्या करंजेकर महाविद्यालयाचे संस्थापक ब्रह्मानंद करंजेकर हे निवडणुकीला उभे राहणार आहेत. यासाठी त्यांनी साकोली तालुक्यात जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली आहे. सोमवारी सुटीचा दिवस असूनही महाविद्यालयाच्या शिक्षकांना घेऊन करंजेकर विविध गावात सभा येत होते. कीन्ही गावातील सभा आटपून सोनेगावच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली. केवळ दैव बलवत्तर होते म्हणून हे दोन्ही शिक्षक वाचले अन्यथा या संस्थापकांच्या प्रचारासाठी शिक्षकांची जीव गेले असते.

हेही वाचा - तान्हा पोळा जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरा

Intro:ANC :- साकोली तालुक्यातील चांदोरी गावाच्या पूर आलेल्या नाल्या वरून चार चाकी गाडी काढण्याचा प्रयत्न करताना स्विफ्ट कार वाहून गेली यात असलेल्या शिक्षकांचे दैव बलवत्तर होते म्हणून दोन्ही शिक्षकांची प्राण वाचले कॉलेज संस्थापकांच्या जनसंपर्क प्रचारासाठी हे शिक्षक गेले होते. Body:आज सकाळपासूनच साकोली तालुक्यात तील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस बरसला करडी रोडवरील चांदोरी गावातील नाल्यावर त्यामुळे पुर आला तरीही साकोली च्या ब्रम्हानंद करंजेकर फार्मसी कॉलेजच्या दोन शिक्षकांनी चुकीचा निर्णय घेत या पुलावरून त्यांची स्विफ्ट गाडी काढण्याचा विचार केला.
देवचंद चांदेवार व मुनेश्वर अशा या सहाय्यक शिक्षकांची नाव आहे यांच्याकडे असलेली स्विफ्ट गाडी त्यांनी पुलावर घातली मात्र पाण्याचा एवढा जास्त होता की गाडी पुलावरून खाली कोसळत पाण्याच्या प्रवाहात वाहत निघाली गाडी पुलावरून कोसळत असतानाच एका शिक्षकाने गाडीच्या बाहेर उडी घेतली त्यामुळे तो सुखरूप बाहेर निघाला मात्र दुसरा शिक्षक त्या गाडीत असल्याने गाडीसह तोही वाहत होता प्रसंगावधान साधून त्या शिक्षकाने पाण्यात उडी घेत एका झाडाचा आधार घेत स्वतःचे प्राण वाचविले गावकऱ्यांना माहीत होताच गावकरी आणि दिवस समाजाच्या लोकांनी नाल्याच्या दुसऱ्या बाजूने दोर घालत त्या शिक्षकाला सुखरूप बाहेर काढले.
पुढच्या काही दिवसात विधानसभा निवडणूक होणार आहे या निवडणुकीत साकोली च्या करंजेकर कॉलेजचे संस्थापक ब्रह्मानंद करंजेकर
हे निवडणुकीला उभे राहणार असून यासाठी त्यांनी साकोली तालुक्यात जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली आहे आज सुटीचा दिवस असूनही कॉलेजच्या शिक्षकांना घेऊन करंजेकर विविध गावात सभा येत होते कीन्ही गावातील सभा आटपून सोनेगाव च्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली केवळ दैव बलवत्तर होते म्हणून हे दोन्ही शिक्षक वाचले अन्यथा या संस्थापकांच्या प्रचारासाठी शिक्षकांची जीव गेले असते.Conclusion:
Last Updated : Sep 3, 2019, 8:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.