ETV Bharat / state

जिल्ह्यत दोन वेगवेगळ्या घटनेत दोन लोकांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात झालेल्या दोन घटनांंमध्ये एका तरुणीचा आणि एका बालकांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. पडे धुण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीचा अंगावर विजेची जीवंत तार पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली तर दुसऱ्या घटनेत पोपटाची पिल्ले शोधण्यासाठी गेलेल्या एक बालकांचा मृत्यू झाला आहे.

two-people-were-killed-in-two-separate-incident
जिल्ह्यत दोन वेगवेगळ्या घटनेत दोन लोकांचा मृत्यू
author img

By

Published : Mar 15, 2021, 8:05 PM IST

भंडारा - जिल्ह्यत दोन वेगवेगळ्या घटनेत एका तरुणीचा आणि एका बालकांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पहिल्या घटनेत कपडे धुण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीचा अंगावर विजेची जीवंत तार पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली तर दुसऱ्या घटनेत पोपटाची पिल्ले शोधण्यासाठी गेलेल्या एक बालकांचा मृत्यू झाला आहे.

पहिली घटना तुमसर तालुक्यतील
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील खरबी गावातील चित्रकला निरंजन बडवाईक (१८वर्ष) ही घरच्या लोकांसोबत कपडे धुण्याकरीता खरबी-विहीरगाव मार्गावरील शेतशिवारातील नाल्यावर गेली होती. या नाल्यावरून थ्री फेज जोडणी जाते. यातील एक जीवंत विद्यूत तार तुटून चित्रकलाच्या अंगावर पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. घटनेची माहिती तुमसर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना व मोहाडी पोलिस ठाण्याला देण्यात आली. घटनस्थाळाचा पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनासाठी मोहाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची नोंद मोहाडी पोलिसात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

चित्रकला ही मोहाडी येथे इयत्ता बारावीत शिकत होती. तिच्या भावाचे लग्न १८ मार्च रोजी ठरले होते. चार दिवसानंतर घरी भावाचे लग्न असताना चित्रकलाच्या दुदैवी मृत्यूने कुटूबियांवर दुःख कोसळले आहे.

दुसरी घटना साकोली तालुक्यातील आहे

कृणाल शिसुपाल जांभुळकर ( ८ वर्ष ) असे मृत बालकाचे नाव आहे. तो जिल्हा परिषद शाळेत ३ वर्गात शिकत होता. खोडकर स्वभावाचा कृणाल शाळा बंद असल्याने दिवसभर शेतशिवारात भटकत असे. १२ मार्च रोजी कृणाल काही मित्रासोबत पोपटाची पिल्ले शोघण्यासाठी रानात गेला होता. उंच झाडावर चढून घरटातून पोपटाची पिल्ले काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी तो तोल जाऊन खाली कोसळला. परिसरातील शेतातील शेतकरी धावून आले. त्याला उपचारासाठी पळसगाव येथे नेण्यात आले. तीन दिवसांच्या उपचारानंतर कुणालचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे कृणालच्या वडिलांचा एक वर्षापूर्वी आकस्मिक मृत्यू झाला होता.

हेही वाचा - बँक कर्मचारी संघटनांच्या संपांने देशामध्ये बँकांचे कामकाज विस्कळित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.