भंडारा - जिल्ह्यातील दोन घोड्यांना ग्लाडर्स आजार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे घोडे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेले घोडे व्यवसायिक ग्लाडर्स या आजारामुळे पुन्हा आर्थिक संकटात सापडणार आहेत. दोन घोड्यांमध्ये हा आजार सापडल्यामुळे जिल्ह्यातील घोड्यांच्या सर्व प्रकारच्या कामावर बंदी आदेश शासनाने निर्गमित केले आहेत. हा आजार घोड्यापासून मनुष्यामध्ये होण्याचा एकही घटना भारतात झाली नसून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे जिल्हा पशुधन उपायुक्त यांनी सांगितले आहे.
नियमित तपासणीत पुढे आले आजार -
दरवर्षी घोड्यांची नियमित तपासणी केली जाते. यावर्षीही जिल्ह्यातील चार घोड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील दोन घोडे या आजारासाठी सकारात्मक आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाकडून काही निर्बंध टाकण्यात आले आहेत. बाधित आणि अन्य घोड्यांचे कुठेही स्थानांतरण करू नये, सोबतच घोडे मालकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
भंंडारा जिल्ह्यातील 2 घोड्यांना ग्लाडर्स आजार, घोड्यांची वाहतूक बंदीचे आदेश - भंडारा घोड्यांना ग्लाडर्स आजारा
भंडारा जिल्ह्यातील दोन घोड्यांना ग्लाडर्स आजार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे घोडे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेले घोडे व्यवसायिक ग्लाडर्स या आजारामुळे पुन्हा आर्थिक संकटात सापडणार आहेत