ETV Bharat / state

पवनीमध्ये भरला आधुनिक ट्रॅक्टर पोळा - आधुनिक ट्रॅक्टर पोळा पवनी

शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणून बैलपोळा साजरा केला जातो. मात्र, आधुनिक काळात बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी चक्क ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन केले आहे. 50 हून अधिक शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन या ट्रॅक्टर पोळ्यात सहभागी झाले होते.

पवनी मध्ये भरला आधुनिक ट्रॅक्टर पोळा
author img

By

Published : Aug 30, 2019, 7:52 PM IST

Updated : Aug 30, 2019, 7:57 PM IST

भंडारा - शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणून बैलपोळा साजरा केला जातो. मात्र, आधुनिक काळात बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी चक्क ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन केले आहे. 50 हून अधिक शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन या ट्रॅक्टर पोळ्यात सहभागी झाले होते. दरम्यान हा ट्रॅक्टर पोळा नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला होता.

पवनी मध्ये भरला आधुनिक ट्रॅक्टर पोळा

ट्रॅक्टर मालकांनी सणानिमित्त ट्रॅक्टरचा अजिबात उपयोग केला नाही. ट्रॅक्टरला स्वच्छ धुऊन काढले. त्यानंतर विविध पद्धतीने हार-तुरे लावून हे ट्रॅक्टर सजवण्यात आले. एका ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरच्या दर्शनी भागाला चक्क बैलाच्या तोंडाची प्रतिकृती बांधली होती. सर्व ट्रॅक्टर एका ठिकाणी गोळा करण्यात आले. हा सर्व प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

आकर्षक सजावट करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना पारितोषिकही देण्यात आले. तर, इतर सर्व सहभागींना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. ट्रॅक्टर पोळ्याचा उत्साह वाढविण्यासाठी भंडारा क्षेत्राचे आमदार रामचंद्र अवसरे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, नगर विकास आघाडीचे अध्यक्ष विलास काटेखाये आदी उपस्थित होते.

Intro:Body:ANC : शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणून बैलपोळा साजरा केला जातो मात्र आधुनिक काळात बैलांची जागा मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरने घेतली आहे आता शेतकऱ्यांचा शेतीतील अविभाज्य घटक झालेला आहे त्यामुळे भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी चक्क ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन केले. 50 हून अधिक शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर घेऊन या ट्रॅक्टर पोळ्यात सहभागी झाले होते या शेतकऱ्यांनचा उत्साह वाढविण्यासाठी आजी माजी आमदारांनी ही या आयोजनात सहभाग दर्शविला होते आधुनिक ट्रॅक्टर पोळा हा नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला होता.

आजच्या आधुनिक व स्पर्धेच्या युगात आज शेतीच्या बहुतांश कामाची जवाबदारी हि ट्रॅक्टर द्वारे पार पाडली जात असून त्या द्वारे कमी कालावधीत जास्त कामे वेळत पूर्ण केली जातात त्यामुळे ज्या प्रमाणे शेतकरी आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत पोळा हा सण मोठ्या थाटात साजरा करतो त्याच प्रमाणे ट्रॅक्टर मालकाने देखील अनोखी शक्कल लढवीत हा अनोखा ट्रॅक्टर पोळा भरविला.
ट्रॅक्टर मालकांनी आज ट्रॅक्टरचा अजिबात उपयोग केला नाही या ट्रॅक्टरला स्वच्छ धुऊन काढले त्यानंतर विविध पद्धतीने हार-तुरे लावून हे ट्रॅक्टर सजवण्यात आले एका ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरच्या दर्शनी भागाला चक्क बैलाच्या तोंडाची प्रतिकृती बांधली होती सर्व ट्रॅक्टर एका ठिकाणी गोळा झाले काय असतो अशा पद्धतीचा असतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती आला. आकर्षक सजावट करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना पारितोषिक देण्यात आले तर इतर सर्व घटकांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आले या आधुनिक ट्रॅक्टर पोळ्याचा उत्साह वाढविण्यासाठी भंडारा क्षेत्राचे आम रामचंद्र अवसरे, माज़ी आम नरेंद्र भोंडेकर, नगर विकास आघाडीचे अध्यक्ष विलास काटेखाये उपस्थित होते.Conclusion:
Last Updated : Aug 30, 2019, 7:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.