ETV Bharat / state

भंडाऱ्यात १२०६ मतदान केंद्रावर होणार मतदान, निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

जिल्ह्यामध्ये एकूण १२०६ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून ९ लाख ९१ हजार ८९० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी प्रशासन सज्ज झाले असून रविवारी सर्व पोलिंग पार्ट्या आपापल्या मतदान केंद्रांवर मतदान पेटी आणि साहित्य घेऊन रवाना झाले आहेत.

भंडाऱ्यात १२०६ मतदान केंद्रावर होणार मतदान
author img

By

Published : Oct 20, 2019, 8:45 PM IST

भंडारा- जिल्ह्यामध्ये एकूण १२०६ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून ९ लाख ९१ हजार ८९० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी प्रशासन सज्ज झाले असून रविवारी सर्व पोलिंग पार्ट्या आपापल्या मतदान केंद्रांवर मतदान पेटी आणि साहित्य घेऊन रवाना झाले आहेत.

भंडाऱ्यात १२०६ मतदान केंद्रावर होणार मतदान

१२०६ मतदान केंद्रापैकी १९ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. तर ७ सखी मतदान केंद्र आणि ७ आदर्श मतदान केंद्र होणार आहे. १२५ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग होणार आहे. जिल्ह्यामध्ये भंडारा विधानसभा, तुमसर विधानसभा आणि साकोली विधानसभा, असे तीन विधानसभा क्षेत्र आहेत. यासाठी ५२०२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रविवारी दुपारनंतर या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी रवाना करण्यात आले आहे. यासह १२ फिरते पथक तर १२ व्हिडिओ निरीक्षक पथक निर्माण करण्यात आले असून सोमवारी मतदानाच्या दिवशी त्यांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण राहणार आहे.

जिल्ह्यामध्ये ५ हजार २७० दिव्यांग मतदार आहेत. या दिव्यांग मतदारांसाठी जिल्ह्यात ९८२ अपंग मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. त्याअंतर्गत ५५४ तीन चाकी व्हीलचेअरची सुविधा असणार आहे. १२५ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग होणार असून यामध्ये तुमसर तालुक्यातील ३५, भंडारा मतदार संघात ५० तर साकोली विधानसभा क्षेत्रातील ४० मतदान केंद्रात वेब कास्टिंग करण्यात येणार आहे.

हेही वाचा- 'भाजप सरकारला धडा शिकवण्याची गरज आहे'

मतदान शांततेत पार पडावे म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात एकूण २३७५ पोलीस कर्मचारी व सुरक्षा रक्षकांची तयारी करण्यात आली आहे. यामध्ये एक बीएसएफची तर राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या सुरक्षेसाठी तैनात राहणार आहेत. या सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या १२२ बसेस, तसेच शाळांची बस आणि खासगी जीप यांचा उपयोग करण्यात आला आहे.

हेही वाचा- मुख्य मुद्द्यावरून लक्ष भटकवण्यासाठीच कलम ३७० चा प्रचार; मुख्यमंत्री बघेल यांचे टिकास्त्र

Intro:Body:ANC : भंडारा जिल्ह्यांमध्ये एकूण 1206 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून नऊ लाख 91 हजार 890 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत या मतदान केंद्रा पैकी 19 मतदान केंद्र संवेदनशील आहेत तर 7 सखी मतदान केंद्र आणि 7 आदर्श मतदान केंद्र होणार आहे.
तर 125 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग होणार आहे. मतदान सुरळीत पार पडावा प्रशासन सज्ज झाले असून रविवारी सर्व पोलिंग पार्टी या आपापल्या मतदान केंद्रांवर मतदान पेटी आणि साहित्य घेऊन रवाना झाले आहेत.
भंडारा जिल्ह्यांमध्ये भंडारा विधानसभा तुमसर विधानसभा आणि साकोली विधानसभा असे तीन विधानसभा क्षेत्र आहेत यासाठी 5202 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे रविवारी दुपारनंतर या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी रवाना करण्यात आले. यासह बारा फिरते पथक तर 12 व्हिडिओ निरीक्षक पथक निर्माण करण्यात आले असून सोमवारी मतदानाच्या दिवशी त्यांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण राहणार आहे.
जिल्ह्यामध्ये पाच हजार 270 दिव्यांग मतदार आहेत या दिव्यांग मतदारांसाठी जिल्ह्यात 982 अपंग मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली असून त्याअंतर्गत 554 तीन चाकी व्हीलचेअरची सुविधा असणार आहे.
125 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग होणार असून यामध्ये तुमसर तालुक्यातील 35 भंडार मतदार संघात 50 तर साकोली विधानसभा क्षेत्रातील 40 मतदान केंद्रात वेब कास्टिंग करण्यात येणार आहे

मतदान शांततेत पार पडावा म्हणून तगडा पोलिस पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे यात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात एकूण 2375 पोलीस कर्मचारी व सुरक्षारक्षकांची तयारी करण्यात आली आहे यामध्ये एक बीएसएफ ची तर राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या सुरक्षेसाठी तैनात राहणार आहेत.
या सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे 122 बसेस तसेच स्कूल बस आणि खासगी जीप यांचा उपयोग करण्यात आले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.