ETV Bharat / state

सनफ्लॅग कंपनी नवीन 'हॉटस्पॉट', प्रादुर्भावाची शक्यता बळावली - sunflag company in bhandara

सनफ्लॅग (आयर्न अँड स्टील) कंपनी कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट झाला आहे. वरठी स्थित सनफ्लॅग कंपनीत कोरोनाचे 39 रुग्ण आढळले आहेत.

corona in bhandara
सनफ्लॅग कंपनी नवीन 'हॉटस्पॉट', प्रादुर्भावाची शक्यता बळावली
author img

By

Published : Aug 13, 2020, 8:40 AM IST

भंडारा - सनफ्लॅग (आयर्न अँड स्टील) कंपनी कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट झाला आहे. वरठी स्थित सनफ्लॅग कंपनीत कोरोनाचे 39 रुग्ण आढळले आहेत. कंपनीतील कोरोना हा केवळ एका संस्थेपुरता मर्यादित राहणारा विषय नसल्याने कंपनी आणि जिल्हा प्रशासनाने याबाबत गंभीर होणे अपेक्षित आहे. काही काळ कंपनी बंद ठेवावी, अशी मागणी कामगार आणि ग्रामस्थांकडून होत असताना त्याकडे जिल्ह्यधिकारी आणि कंपनी प्रशासन मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याने येणाऱ्या काळात 'सनफ्लॅग' कोरोना बॉम्ब म्हणून पुढे येण्याची शक्यता बळावली आहे.

भंडारा शहरापासून १० किमी अंतरावर असलेल्या सनफ्लॅग स्टील कंपनीत हजारो कामगार कार्यरत आहेत. अधिकारी संख्याही मोठी आहे. काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथून आलेल्या एका अधिकाऱ्याच्या माध्यमातून कंपनीत कोरोनाचा शिरकाव झाला आणि प्रादुर्भाव वाढत गेला. सद्यस्थितीत ३९ अधिकारी आणि कर्मचारी आणि कुटुंबातील लोक बाधित आहेत. एच. आर.आणि ट्रेंनिग विभागातील १०, बीएसएम विभागातील १५, क्वालिटी कंट्रोल विभागातील ४, एसमस विभागातील ३, गेस्ट हाऊस मधील ३ कर्मचारी आणि एक कर्मचाऱ्यांच्या घरातील पाच लोक बाधितांमध्ये असल्याचे समजते.

जवळपास सर्वच विभागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बाधितांमधील काही नागपूर, तर काही भंडाऱ्यात उपचार घेत आहेत. बाधितांमध्ये अधिकारी, कामगार आणि गुरुवारी कामगारांच्या कुटुंबातील पाच लोकांचा समावेश आहे. काम करत असताना बाधितांपैकी अनेक जण अन्य लोकांच्या संपर्कात आले. त्यामुळे ही संख्या आणखी वाढण्याची चिन्ह आहे.

प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी कंपनीत प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले. परंतु, ते काही भागापुरतेच. गेस्ट हाऊस, अधिकारी कॉलनी आणि आणखी एक भाग प्रतिबंधित केला आहे. पण प्रत्यक्षात कंपनीत काम अजूनही सुरू आहेत. त्यामुळे कामगार, अधिकारी कंपनीत मोठ्या प्रमाणात येत आहेत. हा प्रकार कोरोनाच्या दृष्टीने नक्कीच पोषक ठरू शकेल.

अनेक कामगार कामाला जाताना चिंता व्यक्त करतात. मात्र, कारवाईच्या भीतीने त्यांचा नाइलाज आहे. हे अधिकारी, कामगार भंडारा, वरठी, मोहाडी, तुमसर, नागपूर सारख्या शहरातून ये जा करतात. त्यामुळे यापैकी कोरोनाबाधित व्यक्ती त्यांच्या परिसरात लोकांमध्ये वावरत असल्याने प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.