ETV Bharat / state

Police Officer on Nana Patole Statement : नाना पटोले यांनी 'त्या' गावगुंड मोदीला अटक केल्याचे सांगितले होते; यावर पोलीस म्हणाले... - Police Officer on Nana Patole Statement

मी जे बोललो, ते गावगुंड असलेल्या मोदी बद्दल होते, असे सांगून सारवासारव करणाचा प्रयत्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. या कथित मोदीला भंडारा पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे त्यांनी ( Nana Patole Statement ) सांगितले होते. साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी वायकर यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू ( Sub Divisional Police Officer on Congress State President ) केली आहे. दरम्यान त्यांनी सांगितले की अद्याप कोणालाही अटक केलेली नाही आहे.

Nana Patole
नाना पटोले
author img

By

Published : Jan 18, 2022, 5:50 PM IST

भंडारा - मी जे बोललो, ते गावगुंड असलेल्या मोदी बद्दल होते, असे सांगून सारवासारव करणाचा प्रयत्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. या कथित मोदीला भंडारा पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे त्यांनी सांगितले होते. साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी वायकर यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू ( Sub Divisional Police Officer on Congress State President ) केली आहे. दरम्यान त्यांनी सांगितले की अद्याप कोणालाही अटक केलेली नाही आहे.

साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी वायकर यांची प्रतिक्रिया

नागपूर विमानतळ सांगितले गाव गुंड मोदीला अटक -

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलीस ठाण्यांमध्ये पटोले यांच्या विरोधात तक्रारी दाखल होऊन गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्यांना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली. हे प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून काल पटोले यांनी स्वतःची बाजू मांडली. मी गावगुंड मोदी बद्दल बोललो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी नाही, असे सांगत या प्रकरणातून अंग काढण्याचा प्रयत्न केला. आज नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना पटोले यांनी त्या कथित गावगुंडाला भंडारा पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगितले होते. वाचा सविस्तर...

उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणाले -

साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी वायकर यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान त्यांनी सांगितले की अद्याप कोणालाही अटक केलेली नाही आहे. 16 जानेवारी रोजी जो प्रकार घडला. व्हायरल झालेल्या चित्रफितीच्या अनुषंगाने चौकशी सुरू असून चौकशी अंती निष्कर्ष येईल त्यानंतरच कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - Chandrakant Patil On Nana Patole : नाना पटोलेंच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार करणार : चंद्रकांत पाटील

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.