भंडारा - जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पूर परिस्थिती कायम असून भंडारा जिल्हा प्रशासनाने लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे कार्य युद्ध पातळीवर सुरू केले आहे. मात्र या कामाला खरी गती मिळाली ती एसडीआरएफ आणि एनडीआरफच्या टीममुळे.
काल (रविवारी) मोहाडी तालुक्यतील मुंढरी गावामध्ये रात्रीला राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरच्या टीमने 452 लोकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले आहे. भंडारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या ढिसाळ कामाचा फटका भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना भोगावा लागला आहे. वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर भंडारा शहराच्या काही सखल भागात पाणी शिरते आणि काही तासानंतर तो पाणी कमी होतो हा अनुभव येथील आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना नेहमीचाच आहे. या वेळही असेच होईल असा विचार करून योग्य नियोजन न कलेल्याने ही पूरपरिस्थिती नागरिकांच्या माथे पडली. कित्येक कुटुंब उघड्यावर आले आहेत.
भंडारा प्रशासन यांच्याकडे केवळ 2 बोट आहेत. तसेच काही नविकाकडून बोट भांड्यावर घेऊन नागरिकांना बाहेर काढण्याचे काम केले जात होते. मात्र हे प्रमाण अतिशय कमी होते. त्यामुळे रविवारी एसडीआरएफ आणि एनडीआरफची टीम बोलाविण्यात अली. नागपूर वरून आलेल्या एसडीआरएफच्या टीम ने मोहाडी तालुक्यतील मुंढरी ( बु.) आणि मुंढरी (खु.) मध्ये फसलेल्या लोकांना बाहेर काढले. या गावाच्या चारही बाजूला पुराने वेढले होते. जवळपास अर्ध्या किलोमीटर पर्यंत हा पाण्याच्या वेढा असल्याने त्यांच्या पर्यंत मदत पोहचविणे कठीण होते. एसडीआरएफची टीम भांडरा येथे दाखल झाल्यानंतर सर्वात पहिले या गावातील लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले गेले. मध्यरात्री पर्यंत हे बचाव कामे सुरू होते. काळोख अंधारात अगदीच नवीन ठिकाण असूनही या जवानांनी न थकता आपल्या जीवाची बाजी लावून या गावातील पुरात फसलेल्या तब्बल 452 लोकांना सुखरूप बाहेर काढले आहे.
भंडारा जिल्ह्याची पूर परिस्थिती अतिशय वाईट होती मात्र ती आता हळू हळू आटोक्यात येत आहे. मात्र अजूनही बराच कालावधी लागेल पूर्ण पाणी निघायला. मात्र जोपर्यंत फसलेल्या प्रत्येक व्यक्तीला बाहेर काढणार नाही तो पर्यंत आम्ही न थकता अविरत बचाव कार्य सुरू ठेवू आणि हेच आमचे कर्तव्य आहे. नागरिकांना एकच विनंती आहे की त्यांनी न धीर सोडू नये, आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोत , असे राज्य आपत्ती दलाच्या पोलीस निरीक्षकांनी सांगितले.