ETV Bharat / state

भंडारा: तरुणाच्या हत्येप्रकरणातील फरारी आरोपींना अटक - bhandra crime news

शहरात सोमवारी झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी 3 तरुणांना अटक करण्यात आली आहे. जुन्या वैमनस्यातून आरोपींनी सूरज परमलाल यादव (25) या तरुणांची हत्या केली होती. हत्येनंतर आरोपी पसार झाले होते.

police arrested 3 accused on youth murder case in bhandra
मृत सूरज परमलाल यादव
author img

By

Published : Jul 1, 2020, 3:50 PM IST

भंडारा - शहरात सोमवारी झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी 3 तरुणांना अटक करण्यात आली आहे. जुन्या वैमनस्यातून आरोपींनी सूरज परमलाल यादव (25) या तरुणांची हत्या केली होती. हत्येनंतर आरोपी पसार झाले होते. कुणाल प्रमोद चुन्हे (25), विशाल अरुण मोटघरे (24), मनीष नंदकिशोर हटवार (19) सर्व राहणार शुक्रवार वॉर्ड, भंडारा या सर्व आरोपींना पोलिसांनी वरठी येथून अटक केली आहे.

सोमवारी दुपारी तीनच्या दरम्यान सूरज परमार यादव या तरुणाच्या मानेवर आणि पोटावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. दहा दिवसात ही दुसरी हत्येची घटना शहरात घडली होती. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. हत्या ज्याठिकाणी झाली तो गजबजलेला परिसर होता. त्यामुळे हत्या होताना नागरिकांनी नक्कीच बघितले होते. मात्र, पोलिसांनी वारंवार विचारपूस करूनही परिसरातील एकही नागरिक याविषयी बोलायला तयार नव्हते. त्यामुळे आरोपी हे याच परिसरातील असतील अशी शंका पोलिसांना निर्माण झाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता आरोपी हे वरठी येथे लपून असल्याची माहिती मिळाली. या तिन्ही आरोपींना पोलिसांनी वरठी येथून अटक केली आहे.

मृत सूरज हा मूळचा नागपूर लगतच्या हिंगणा येथील रहिवासी होता. मागील काही दिवसांपासून तो शुक्रवार परिसरात भाड्याच्या घरी राहत होता. महिन्याभरापूर्वी आरोपी आणि मृत यांच्यामध्ये भांडण झाले होते. या तिघांनाही मृत सुरजने मारहाण केली होती. याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र, सुरजने मारहाण केल्याचा बदला घेण्याची मानसिकता या तिन्ही आरोपींनी बनवून ठेवली होती.

सुरजची हत्या करण्याची योजना आखून सोमवारी हे तीनही आरोपी धारदार शस्त्र घेऊन सुरजची वाट पाहत होते. शुक्रवारी परिसरातील विघ्नहर्ता हॉटेल ते किसान चौक या परिसरातून सूरज आपल्या घराकडे जात असताना आरोपींनी त्याला अडवून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोपी मोटारसायकल घेऊन तिथून पसार झाले होते.

याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंधू, पोलीस निरीक्षक लोकेश कानसे आणि डीबी पथकाचे पोलीस निरीक्षक अमरदीप खाडे यांनी तपासाचे चक्रे फिरवली. या प्रकरणातील तीनही आरोपींना अटक करून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.