ETV Bharat / state

Paralysis Attack : आधुनिक पद्धतीने वेळेत उपचार घेतल्यास पॅरालिसिस होतो बरा; अशी घ्या काळजी - पॅरालिसिसची लक्षणे

ताणतणावाची जीवनशैलीमुळे पॅरालिसिस आजार कोणालाही होऊ शकतो. पॅरालिसिसची लक्षणे आढळताच रुग्णाला साडेचार तासांच्या आत उपचार दिल्यास पॅरालिसिसचा आजार ९५ टक्के बरा होत असल्याचे डॉ. राजदीप चौधरी यांनी सांगितले.

Paralysis Attack
पक्षघात आजार
author img

By

Published : Aug 12, 2023, 8:52 PM IST

भंडारा : जगातील तिसरा क्रमांकाचा आजार म्हणजे पक्षघात याला इंग्रजीमध्ये Paralysis असेही म्हणतात. एवढ्या घातक आजाराबद्दल नागरिक अजूनही गंभीर नाहीत. पॅरालिसिस होताच सुवर्ण वेळात म्हणजे साडेचार तासाच्या आत रुग्णाला उपचार मिळाल्यास रुग्ण नक्की बरा होऊ शकतो. त्यामुळे पॅरालिसिस झाल्यावर इतरत्र कोणतेही अवैधानिक उपचार न करता रुग्णांना जनरल फिजिशियन किंवा न्यूरोलॉजिस्टकडे आणल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. यासाठी लोकांमध्ये जागृती येणे गरजेचे असल्याचे मत, हृदयरोग तज्ञ व जनरल फिजिशियन डॉ. राजदीप चौधरी यांनी व्यक्त केले आहे.

साडेचार तास अतिशय महत्वाचे : पॅरालिसिस म्हणजेच ब्रेनस्ट्रोक या आजार म्हणजे एक अभिशाप आहे. कारण हा आजार झाल्यानंतर मनुष्य पूर्णपणे परावलंबी होतो. ना त्याला बोलता येत ना त्याला चालता येत, बरेचदा संपूर्ण आयुष्य अंथरुणावरच काढावे लागते. पण तरीही आम्ही या आजाराला पाहिजे त्या प्रमाणात गांभीर्याने घेत नाही. लोकांमध्ये या आजाराच्या उपचारविषयी जनजागृती नाही. हृदयाचा झटका येताच रुग्णांना लगेच डॉक्टरकडे उपचारासाठी नेतात. याउलट पॅरालिसिस आजाराची लक्षणे दिसताच गावठी उपचार सुरू करण्यावर भर दिला जातो. कित्येक वेळा केरोसीन प्यायला दिले जाते. मात्र यात वेळ निघून गेल्यानंतर रुग्णाला योग्य उपचारा अभावी एकतर जीव गमवावा लागतो किंवा कायमचे अपंगत्व नशिबी येते. केरोसीन घेतल्याने आजार तर बरा होत नाही उलट भविष्यात त्याचे दुष्परिणाम होतात.

दोन मिनिटाला तीन लोकांना पॅरालिसिसचा झटका : हृदयविकारानंतर पॅरालिसिसने मृत्यू होण्याचे प्रमाण भारतात अधिक आहे. दर दोन मिनिटाला तीन लोकांना पॅरालिसिसचा झटका येतो. पॅरालिसिसच्या झटक्यानंतर एका मिनिटात 20 लाख पेशी निकामी होतात. इतक्या मोठ्या प्रमाणात या आजारामुळे नुकसान होते. त्यामुळे पॅरालिसिसचा झटका येतात लगेच तज्ञ डॉक्टरांकडे गोल्डन अवर्समध्ये म्हणजेच साडेचार तासाच्या आत पोहोचणे गरजेचे आहे. आजचा आधुनिक आणि योग्य उपचार वेळेवर मिळाल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के असल्याचे डॉक्टर चौधरी यांनी सांगितले.

हे लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरकडे जा : तोंड वाकडे होणे, बोलताना अडखळणे, हाता पायाची शक्ती जाणे, तोल जाणे आणि भ्रामक स्थितीत व्यक्ती जाऊ लागल्यास हा पॅरालिसिस असू शकतो. या आजारावर गावठी किंवा अन्य घरगुती उपचार करून रुग्णाचा जीव धोक्यात टाकण्याऐवजी वेळेत रुग्णालयात पोहोचून आवश्यक ते उपचार घेणे गरजेचे आहे. पॅरालिसिसवर उपचार करण्यासाठी नवीन उपचार पद्धती उपलब्ध आहे. एका विशिष्ट इंजेक्शन एखाद्याचे आयुष्य वाचवू शकतो. या आधुनिक उपचार पद्धतीमुळे आतापर्यंत अनेक लोकांना पॅरालिसिसच्या आजारातून अगदी ठणठणीत बरे केले असल्याचे डॉक्टर चौधरी यांनी सांगितले. मात्र या सर्व प्रकारात वेळ हे अतिशय महत्त्वाचे बाब असून ज्या रुग्णांना साडेचार तासाच्या आत उपचार मिळाले तर त्यांनाच आम्ही बरे करू शकलो. त्यामुळे पॅरालिसिसचा झटका येतात त्वरित डॉक्टरकडे उपचारासाठी न्यावे असे त्यांनी आवर्जून सांगितले.

केवळ पाच दिवसात रुग्ण चालायला लागला : पॅरालिसिसचा एक नुकताच घडलेला अनुभव सांगताना त्यांनी सांगितले की, एका 26 वर्षीय महिलेला पॅरालिसिसचा झटका आला. यामध्ये तिचा उजवा हात आणि उजवा पाय पूर्णपणे निकामी झाला. तिच्या पतीने आणि कुटुंबाने वेळ न गमविता तिला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात आणले. रुग्णालयात या महिलेला केवळ अर्धा तासाच्या आत सर्व चाचण्या करून उपचार सुरू करण्यात आले. या आधुनिक उपचार पद्धतीमध्ये प्लॉट ब्लास्टर नावाचा इंजेक्शन देण्यात येतो. इंजेक्शनमुळे केवळ चार टक्के रुग्णांना रक्तस्त्राव होण्याची भीती असते. उर्वरित 96 टक्के रुग्ण यामुळे ठणठणीत बरे होतात. या रुग्णालाही इंजेक्शन दिल्यानंतर केवळ पाच दिवसांमध्ये ही रुग्ण स्वतःच्या पायावर चालायला लागली. या रुग्णाच्या बाबतीत आलेला अनुभव विलक्षण आणि चमत्कारिक असल्याचे डॉक्टर चौधरी यांनी सांगितले.

जनजागृती होणे गरजेचे : पॅरालिसिस या आजाराबद्दल लोकांमध्ये जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. कायमचे अपंगत्व किंवा जीवाला मुकण्यापेक्षा योग्य वेळी योग्य उपचार घेऊन जीव वाचविला जाऊ शकतो. ज्यांच्या कुटुंबात पॅरालिसिसचा आजार असलेले रुग्ण आहे त्यांना या आजाराची गांभीर्यता नक्कीच जाणवते. कारण पॅरालिसिसनंतर रुग्ण १ वर्ष, २ वर्ष कित्येकदा 10-10 वर्ष अंथरुणावर पडलेले असतात. या सर्व त्रासातून वाचायचा असल्यास वेळेवर आणि योग्य वैद्यकीय उपचार होणे अत्यंत महत्वाचे आहे असे डॉक्टर राजदीप चौधरी यांनी सांगितले.

हेही वाचा -

  1. Sleep Paralysis : स्लीप पॅरालिसिस ठरू शकते गंभीर; जाणून घ्या त्याची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंध
  2. World Paralysis Day जागतिक पक्षाघात दिनाच्या निमित्ताने वॉकेथॉन, आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न

माहिती देताना डॉ. राजदीप चौधरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.