ETV Bharat / state

भंडारा : अस्वलाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, आर्थिक भरपाई देण्याची गावकऱ्याची मागणी - पुयार गाव

भंडाऱ्यामधील लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील रहिवासी पुष्पा आत्माराम उके मादी अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत.

जखमी महिला
author img

By

Published : Apr 7, 2019, 11:34 PM IST

भंडारा - लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील रहिवासी पुष्पा आत्माराम उके (५०) मादी अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्या मुलगी प्राजंली उके (१९) हिच्यासोबत शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जंगलात सरपण आणण्यासाठी गेल्या असताना ही घटना घडली.

दोघी मायलेकी सरपण गोळा करण्यासाठी गावाला लागूनच असलेल्या जंगलात गेल्या होत्या. यावेळी अचानक मादी अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. यात पुष्पा उके गंभीर जखमी झाल्या. यावेळी त्यांची मुलगी प्रांजली हिने पळ काढून आरडाओरड केली. यानंतर गावातील लोकांनी त्यांना लाखांदूर रुग्णालयात उपचाराकरिता भरती केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने आणि जखमा गंभीर असल्यामुळे त्यांना उपचारासाठी भंडारा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेचा पंचनामा लाखांदूर पोलीस आणि वनविभागाने केला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

पुष्पा या विधवा असून अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना मुलगी प्रांजलीची चिंता वाटू लागली आहे. माझ्या मुलीला कोण सांभाळणार, अशी विनवणी त्या रुग्णालयात करत आहेत. त्यामुळे सरकारने त्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Intro:Body:

अस्वलाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

..........................................................

पुयार येथील घटना:आर्थिक भरपाई देण्याची मागणी

 लाखांदूर:

        तालुक्यातील पुयार येथील रहिवासी पुष्पा बाई आत्माराम उके वय50,व मुलगी प्रांजली उके वय19 .सदर मायलेकी जंगलात सरपण आणण्यासाठी गेली असता वाटेतच अस्वलीने हल्ला केला.यात पुष्पा हिला गंभीर दुखापत झाली .तर मुलगी प्रांजली ही याता.6 एप्रिल ला सकाळी 7 वाजताची घटना  घडली.यातील गंभीर जखमी झालेल्या पुष्पा उके हिला लाखांदूर रुग्णालयातून भंडारा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.प्रकृती चिंताजनक असून पायाला गंभीर दुखापत आहे.सदर घटनेचा पंचनामा लाखांदूर पोलिश व वनविभाग यांनी केला असून पुढील तपास सुरू आहे.तरी सदर महिलेला आर्थिक मदत शासनाने करावी अशी मागणी कुटुंबातील सदस्य करीत आहेत.

        तालुक्यातील पुयार येथील पुष्पा आत्माराम उके व मुलगी प्रांजली ह्या दोघीही सरपण गोळा करण्यासाठी गावाला लागूनच असलेल्या जंगलात गेल्या होत्या. काल ता.6 एप्रिल ला सकाळी 7 च्या दरम्यान जंगलात जात असताना अचानक अस्वलीने हल्ला केला.या हल्ल्यात पुष्पा गंभीर जखमी झाली. हे पाहताच मुलगी प्रांजली हिने पळ काढून आरडाओरड केली.लगेच गावातील लोक येऊन पुष्पा हिला लाखांदूर रुग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने व जखम जबर असल्याने तिला छातीवर,व पाया च्या गुढग्यावरील मास निघाल्याने तिला उपचारासाठी भंडारा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. अस्वलाच्या हल्ल्यात जास्तच जखमी झाल्याने तिला मुलगी प्रांजली चिंता वाटू लागली .व माझ्या मुलीला कोण सांभाळणार अशी विनवणी करत होती.सध्या पुष्पा ही विधवा असून मुलगी प्रांजली सोबत राहत होती.आता माझ्या मुलीला कोण सांभाळणार असे अनेक विचार करत गावातील लोकांना सांगत होती.तरी सदर घटनेतील जखमी महिलेला तात्काळ आर्थिक मदत करून उपचारासाठी मदत करावी .अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.