भंडारा - अबब! भंडारा जिल्ह्यात महिलांनी वटसावित्रीनिमित्त चक्क वडाच्या झाडाला सॅनिटाझरचा दिवा लावून आणि वडाच्या झाडाला मास्कची ओटी भरत पूजा केली आहे. ऐकून धक्का बसला ना पण हे खरे आहे. वटसावित्री निमित्त वडाच्या झाड़ाजवळ ही अनोखी पूजा केली आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाड़ी शहरातील महिलांनी कोरोना पासून आपल्या पतींचे रक्षण व्हावे यासाठी ही नवीन पद्धतीची पूजा केली आहे.
कोरोनापासून पतीचे रक्षण करण्यासाठी वटसावित्रीची नवीन पद्धतीने पूजा - bhandara news
पतीचे आयुष्य वाढविण्यासाठी महिला वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात. या वर्षी ही महिलांनी वडाच्या झाडाची पूजा केली मात्र एका वेगळ्या पद्धतीने. पूजेला निघालेल्या या महिलांच्या थाळी मध्ये नारळ, पूजेचे समान, दिवा आणि सॅनिटाझर आणि मास्क. सॅनिटाझरचा दिवा, मास्कची ओटी, भर वड देवा माझ्या पतीच्या आयुष्याची ज्योती हे गाणे म्हणत मोहाड़ी शहरातील महिला वटसावित्रीच्या पुजेला पोहचल्या.
टसावित्रीची नवीन पद्धतीने पूजा