ETV Bharat / state

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून पहिल्यांदाच भंडाऱ्यातून 'विशेष यात्रा ट्रेन' जाणार - भंडारा रोड रेल्वे स्थानक

'इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड'तर्फे लोकांसाठी कमी दरात 'नवरात्री कामाख्या दर्शन यात्रा' ही स्पेशल 'भारत दर्शन टूरिस्ट ट्रेन' भंडारा रोड रेल्वे स्थानकावरून २५ मार्च २०२० पासून ९ दिवसांची ही यात्रा कलकत्ता, गुवाहाटी, गया या ठिकाणी जाणार आहे.

भंडारा रोड रेल्वे स्थानकावरून स्पेशल 'आस्था ट्रेन' करता येणार देवदर्शन

author img

By

Published : Jan 9, 2020, 10:02 AM IST

भंडारा - दक्षिण मध्य रेल्वेकडून भंडारा रोड स्थानकावरून पहिल्यांदाच नवरात्री दरम्यान 'स्पेशल यात्रा रेल्वे' सुरू होणार आहे. 'इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड'तर्फे लोकांसाठी कमी दरात 'नवरात्री कामाख्या दर्शन यात्रा' ही स्पेशल 'भारत दर्शन टूरिस्ट ट्रेन' भंडारा रोड रेल्वे स्थानकावरून २५ मार्च २०२० पासून ९ दिवसांची ही यात्रा कलकत्ता, गुवाहाटी, गया या ठिकाणी जाणार आहे. यात एका व्यक्तीला केवळ ८ हजार ५१० रुपयात संपूर्ण व्यवस्थेसह ही ९ दिवसांची यात्रा करता येणार आहे. अशी माहिती मंगळवारी बिलासपूर क्षेत्र प्रबंधक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भंडारा रोड रेल्वे स्थानकावरून स्पेशल 'आस्था ट्रेन' करता येणार देवदर्शन

चैत्र नवरात्रीचे औचित्य साधून २५ मार्च २०२० ला आस्था ट्रेन भंडारा रोड स्थानकावरून सुटणार आहे. तर, यात्री त्यांच्या सुविधेनुसार गोंदिया, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, चंपा, कोरबा, रायगड, या बोर्डींग स्थानकावरून देखील बसू शकणार आहेत. या ९ दिवसांच्या यात्रेदरम्यान कलकत्ता येथील काली मंदिर, गंगासागर, दक्षिणेश्वर मंदिर, बिडला मंदिर गुहाटी येथील कामाख्या देवी मंदिर, नवग्रह मंदिर शंकरदेव कलाक्षेत्र तर, गया येथील वशिष्ठ मुनी आश्रम आणि शिव मंदिर या ठिकाणी प्रवाशांना दर्शनासाठी नेले जाणार आहे.

या ९ दिवसांच्या प्रवासासाठी प्रतिव्यक्ती ८ हजार ५१० रुपये स्लीपर कोचसाठी तर, १० हजार ४०० रुपये एसी कोचसाठी खर्च येणार आहे. या पॅकेजमध्ये प्रवाशांसाठी प्रत्येक ३० माणसांमागे एक गाईड राहणार आहे. तसेच, रेल्वे स्थानकावरून मंदिरापर्यंत जाण्यासाठी बसेस, डॉक्टरांची सुविधा, प्रवाशांचा इन्शुरन्स, रात्रीची विश्रांतीची सुविधा, चहा, कॉफी, नाश्ता, लंच, डिनर आदी सर्व व्यवस्थाही असणार आहे.

हेही वाचा - भंडाऱ्यात 'भारत बंद'ला अत्यल्प प्रतिसाद; बँका बंद मात्र बस सेवा अन् शासकीय कार्यालये सुरू

भंडाऱ्यावरून पहिल्यांदा सुरू होणारी ही 'नवरात्री कामख्या देवी भारत दर्शन यात्रा' रेल्वे जिला 'आस्था ट्रेन' म्हणूनही ओळखले जाते. तिचा जिल्ह्यातील लोकांनी जास्तीत जास्त फायदा करून या दर्शनीय स्थानाला भेट द्यावी, अशी विनंती बिलासपूर क्षेत्रीय प्रबंधक राजेंद्र बोरबन यांनी केली आहे.

हेही वाचा - रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गासाठी नागरिकांचे आंदोलन

Intro:ANC : - दक्षिण मध्य रेल्वे द्वारा भंडारा रोड वरून पहिल्यांदाच स्पेशल यात्रा ट्रेन नवरात्री दरम्यान सुरू होणार आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे लोकांसाठी कमी दरात "नवरात्री कामाख्या दर्शन यात्रा" ही स्पेशल भारत दर्शन टूरिष्ट ट्रेन भंडारा रोड रेल्वे स्टेशन वरून 25-3- 2020 पासून नऊ दिवसाच्या यात्रेवर कोलकत्ता, गुवाहाटी, गया या ठिकाणी जाणार आहे. केवळ 8510 रुपयात एका व्यक्तीला संपूर्ण व्यवस्थेसह ही नव दिवसाची यात्रा करता येणार असल्याचे बिलासपूर क्षेत्र प्रबंधक यांनी मंगळवारी प्रेस कॉन्फरन्स मध्ये माहिती दिली.

Body:चैत्र नवरात्री औचित्य साधून 25 मार्च 2020 ला ही ट्रेन भंडारा रोड वरून सुटणार आहे भंडारा रेल्वे स्टेशन वरून ही ट्रेन सुटणार असून यात्री यांच्या सुविधा नुसार गोंदिया, राजनांदगाव, दुर्ग, रायपुर, बिलासपूर, चंपा, कोरबा, रायगड, हे देखील बोर्डींग स्टेशन असणार आहेत.
या नऊ दिवसाच्या यात्रेदरम्यान कोलकत्ता येथील काली मंदिर, गंगासागर, दक्षिणेश्वर मंदिर, बिडला मंदिर गुहाटी येथील कामाख्या देवी मंदिर नवग्रह मंदिर शंकरदेव कलाक्षेत्र तर गया येथील वशिष्ठ मुनी आश्रम आणि शिव मंदिर या ठिकाणी प्रवाशांना दर्शनासाठी नेले जाणार आहे.
या नऊ दिवसाच्या प्रवासासाठी प्रतिव्यक्ती 8510 स्लीपर कोच साठी तर 10400 एसी कोच साठी खर्च येणार आहे. या पॅकेज मध्ये प्रवाशांसाठी प्रत्येक 30 माणसामागे एक गाईड राहील, रेल्वे स्टेशन वरून मंदिरापर्यंत जाण्यासाठी बसेस राहतील, डॉक्टरांची सुविधा राहील, प्रवाशांचा इन्शुरन्स राहील, रात्रीची विश्रांती ची सुविधा चाय कॉफी नाश्ता लंच डिनर ही सर्व व्यवस्था राहणार आहे.
भंडारा वरून पहिल्यांदा सुरू होणाऱ्या या नवरात्री कामख्या देवी भारत दर्शन यात्रा जि आस्था ट्रेनमधून ओळखली जाते तिचा जिल्ह्यातील लोकांनी जास्तीत जास्त फायदा करून या दर्शनीय स्थानाला भेट द्यावी अशी विनंती बिलासपुर क्षेत्रीय प्रबंधक राजेंद्र बोरबन यांनी केली आहे.
बाईट : राजेंद्र बोरबन, बिलासपूर क्षेत्र प्रबंधक

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.