ETV Bharat / state

भंडारा-गोंदिया लोकसभेत भाजपच्या उमेदवाराला मदत करणार नाही - नरेंद्र भोंडेकर - Lok Sabha

केंद्रात आणि राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. तरीही भंडारा-गोंदिया लोकसभेत भाजपच्या उमेदवाराला मदत करणार नाही.

नरेंद्र भोंडेकर
author img

By

Published : Mar 23, 2019, 7:16 PM IST

भंडारा - केंद्रात आणि राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. तरीही भंडारा-गोंदिया लोकसभेत भाजपच्या उमेदवाराला मदत करणार नाही, असे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जाहीर करून युतीच्या राजकारणात वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

केवळ ४८ तासांचा कालावधी उर्वरित असूनही भाजपने भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अशातच शिवसेनेचे माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी एक घोषणा करून भाजप नेत्यांमध्ये गोंधळाची आणि संभ्रमाची स्थिती तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.

मागील २ वर्षापासून भाजप शिवसैनिकांची गळचेपी करून त्यांच्यावर सतत अन्याय करत आहे. २०१४ च्या निवडणुकीनंतर भंडाऱ्याला शिवसेनेचे दिपक सावंत हे पालकमंत्री म्हणून लाभले. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांना सह पालकमंत्री बनवून भाजपने आपले राजकारण सुरू केले. शेवटी दिपक सावंत यांनी पालक मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बावनकुळे यांना भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री बनविले गेले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी आणि स्थानिक भाजप नेत्यांनी शिवसेने लोकांना वेगवेगळ्या सर्व समितीतून बाहेर काढले. तेव्हापासुन शिवसैनिकांमध्ये धुसफूस सुरू झाली. आता निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी शिवसेनेला भंडाऱयामध्ये भाजपचे लोक विश्वासात घेत नाहीत, असा आरोप शिवसैनिक करीत आहेत. त्यामुळेच येथील शिवसैनिक कार्यकर्त्यांसह एक बैठक घेऊन त्या अनुषंगाने भाजपला २०१९ च्या लोकसभेमध्ये मदत करायची नाही, त्यांना मतदानही करायचे नाही, असे ठरवण्यात आले आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभेत भाजपच्या उमेदवाराला मदत करणार नाही - नरेंद्र भोंडेकर

जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावे, विविध समित्यांमध्ये शिवसेनेला ४० टक्के वाटा मिळावा, येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये युती कायम ठेवावी तसेच भंडारा विधानसभेची जागा युतीमध्ये शिवसेनेला वाट्याला येत आहे. ती लोकसभा निवडणूकीनंतर शिवसेनेला द्यावी, अशा शिवसैनिकांच्या मागण्या आहेत.

शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र भोंडेकर हे २००९ मध्ये युती असताना शिवसेनेच्या तिकीटवर भंडारा विधानसभेमध्ये निवडून आले होते. मात्र, २०१४ मध्ये युती न झाल्याने भाजपच्या रामचंद्र अवसरे यांनी नरेंद्र भोंडेकर यांचा पराभव केला होता. त्यामुळे भाजप २०१९ मध्ये विधानसभेची भंडाराची विधानसभा जागा स्वतःकडे ठेवील, याची भीती नरेंद्र भोंडेकर यांना असल्याने लोकसभेच्या तोंडावर दबाव तंत्राचा उपयोग करण्यासाठी नरेंद्र भोंडेकर यांनी ही खेळी खेळली असल्याचे भाजपचे नेते सांगत आहेत. मात्र, यावर लवकरच तोडगा निघेल आणि शिवसेना आम्हाला या पुर्णपणे मदत करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

नरेंद्र भोंडेकर यांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता जोपर्यंत होणार नाही, तसेच ठोस आश्वासने मिळत नाहीत तोपर्यंत भाजपला मदत न करण्याच्या मुद्यावर ठाम असल्याचे भोंडेकर यांनी सांगितले.

Intro:Anc : केंद्रात आणि राज्यात बीजेपी आणि शिवसेनेची युती झाली असली तरी भंडारा-गोंदिया लोकसभेच्या बीजेपीच्या उमेदवाराला आम्ही मदत करणार नाही असे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जाहीर करून भंडाऱ्यातील युतीच्या राजकारणात वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Body:केवळ 48 तासांचा कालावधी उर्वरित असूनही बीजेपी ने भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे अशातच शिवसेनेचे माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी एक घोषणा करून बीजेपी नेते आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये गोंधळाची आणि संभ्रमाची स्थिती उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला आहे.
मागील 2 वर्षापासून बीजेपी शिवसैनिकांची गळचेपी करून त्यांच्यावर सतत अन्याय करीत आहे 2014 च्या निवडणुकीनंतर भंडारा आला शिवसेनेचे दीपक सावंत हे पालकमंत्री म्हणून लाभले त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांना सह पालकमंत्री बनवून बीजेपी ने आपले राजकारण सुरू केले शेवटी दीपक सावंत यांनी पालक मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर बावनकुळे यांना भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री बनविला गेला त्यानंतर पालकमंत्र्यांनी आणि स्थानिक बीजेपी नेत्यांनी शिवसेनेच्या लोकांना वेगवेगळ्या सर्व समितीतून बाहेर काढले आणि तेव्हापासुन शिवसैनिक आहेत धुसफूस सुरू झाली आता निवडणुका जाईल झाल्या असल्या तरी शिवसेनेला भंडारा मध्ये बीजेपी चे लोक विश्वासात घेत नाही असा आरोप शिवसैनिक करीत आहेत आणि त्यामुळेच येथील शिवसैनिक कार्यकर्त्यांसह एक बैठक घेऊन त्या अनुषंगाने बीजेपी ला 2019 च्या लोकसभेमध्ये मदत करायची नाही त्यांना मतदान हि करायचं नाही असं ठरविण्यात आले.
शिवसेनेची मागणी आहे की जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावे विविध समित्यांमध्ये शिवसेनेला 40 टक्के वाटा मिळावा आणि येत्या जिल्हा परिषद परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये युती कायम ठेवावी तसेच भंडारा विधानसभेची जागा युतीमध्ये शिवसेनेला वाट्याला येत आहे ती लोकसभा निवडणूकीनंतर शिवसेनेला द्यावी अशी मागणी या शिवसैनिकांची आहे.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र भोंडेकर हे 2009 मध्ये युती असताना शिवसेनेच्या तिकीटवर भंडारा विधानसभे मधून निवडून आले होते मात्र 2014 मध्ये युती न झाल्याने बीजेपीच्या रामचंद्र अवसरे यांनी नरेंद्र भोंडेकर यांचा पराभव केला होता त्यामुळे बीजेपी 2019 विधानसभेमध्ये ही ही भंडाराची विधानसभा सीट स्वतः ठेवील याची भीती नरेंद्र भोंडेकर यांना होत असल्याने लोकसभेच्या अगदी तोंडावर दबाव तंत्राचा उपयोग करण्यासाठी नरेंद्र भोंडेकर यांनी ही खेळी खेळली असल्याचं बीजेपीचे नेते सांगत आहेत मात्र यावर लवकरच तोडगा निघेल आणि शिवसेना आम्हाला या पुर्णपणे मदत करेल असा विश्वासही त्यांनी दाखविला आहे.
तर नरेंद्र भोंडेकर यांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता जोपर्यंत होणार नाही तसेच ठोस आश्वासने आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही बीजेपीला मदत न करण्याच्या यावर ठाम आहोत असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
बाईट : नरेंद्र भोंडकर, माजी आमदार, शिवसेना

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.