भंडारा - तुमसर तालुक्यात वैनगंगा नदीच्या मध्यभागी विदर्भातील एकमात्र नरसिंह भगवानाचे मंदिर आहे. संपूर्ण विदर्भात हे श्रद्धा स्थान प्रसिद्ध असल्याने दरवर्षी येथे मोठी जत्रा भरते. लाखो भाविक या ठिकाणी भगवान नरसिंहाचे दर्शन घेतात.
हेही वाचा - मंडळ कृषी अधिकारी कार्यालय बनले शोभेची वस्तू, कर्मचाऱ्यांची कमतरता
भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा नदी वाहते. याच नदीच्या मध्यभागी भगवान नरसिंह देवाचे विदर्भातील एकमात्र मंदिर तुमसर तालुक्यातील माडगी या ठिकाणी आहे. या मंदिराच्या खालच्या बाजूला आण्णा महाराजांचे मंदिर आहे. दरवर्षी नरसिंह भगवान व आण्णा महाराज यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी भव्य यात्रा भरते. लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असल्यामुळे या ठिकाणी दूर-दूरवरून भाविक दर्शनाला येतात.
हेही वाचा - खर्रा दिला नाही म्हणून फोडलं डोकं, आरोपीवर गुन्हा दाखल
नरसिंह भगवानाविषयी या ठिकाणी लोक दंतकथाही सांगतात. तर आण्णा महाराज हे 1950 ला या ठिकाणी आले. त्यांनी योग साधना केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे शिष्य असलेले आण्णा महाराज यांनी संतांची शिकवण लोकांमध्ये पोहोचवण्याचे काम केले.
पावसाळ्यात हे मंदिर सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेले असते. संपूर्ण मंदिर पाण्याखाली येते. मात्र, देव कधीही पाण्यात बुडत नाही, असे येथील लोक सांगतात. पावसाळ्यानंतर नदीच्या एका बाजूने पाण्याचा प्रवाह वाहतो. तर जी जागा खाली आहे, तिथे ही जत्रा भरते. येथे येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.