भंडारा - सर्वोच्च न्यायालयाने केंद्रांना ओबीसी जनगणना करा असे सांगितले होते मात्र आकडेवारी केंद्राने दिली नाही. व आम्ही ओबीसी जनगणना करणार नाही आणि आकडेवारी ही देणार नाही असे लोकसभेमध्ये गृहमंत्र्यांनी सांगितले होते. एकंदरीतच ओबीसीचे आरक्षण बंद पाडण्याचे काम स्वतः भाजपाने पाडले केले आहे. असा पलटवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे केला आहे. तसेच ढिवर समाजाला दिलासा देत यावर्षीची तलावाची लीज पूर्णपणे माफ करण्याचा त्यांनी घोषणा केली आहे. उद्यापासून उन्हाळी धान खरेदी सुरू होणार असून शेतकऱ्यांचे बोनसही लवकरच दिला जाईल असे त्यांनी सांगितले.
चोराच्या उलट्या बोंबा फडणवीसांना टोला -
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा भाजप आणि पाडला आहे. 2017 च्या बिहार निवडणुकीत सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षण रद्द करावे असे वक्तव्य केले होते. तर पंतप्रधान हे संघाचे प्रचारक असल्याचे स्वतः सांगितले आहे. प्रचारक या नात्याने त्यांनी आरक्षण विरोधी व्यवस्था निर्माण केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्रांना ओबीसी जनगणना करा असे सांगितले होते मात्र आकडेवारी केंद्राने न दिल्याने 1931 च्या आकडेवारी नुसार सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिले आहेत. आम्ही जनगणना करणार नाही आणि आकडेवारी ही देणार नाही असे लोकसभेमध्ये गृहमंत्र्यांनी सांगितले होते. एकंदरीतच ओबीसी आरक्षणाचे बंद पाडण्याचं काम स्वतः भाजपाने पाडले तरीही देवेंद्र फडणवीस इतरांना दोष देत असतील तर या चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा नाना पटोले यांनी म्हटलेले आहे.
देवेंद्र फडणवीस आणि भाजप हे दोन्ही खोटारडे आहेत भाजपाचा हा खोटारडा रूप ओबीसी बांधवांना समजले असून येत्या काळात भाजपाला त्याची त्यांची जागा दाखविणार आहेत.
उन्हाळी धान खरेदी सुरू तर तलावाची लीज माफ -
यावर्षी धानाची आणेवारी पन्नास आली आहे. शेतकऱ्यांसह ढिवर समाजालाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या सर्व तलावाची लीज माफ केल्याचा आदेश काढण्यात आलेला आहे. भंडारा जिल्ह्यात खरीपाची एकूण 37 लाख क्विंटल खरेदी झाली आहे. यापैकी चौदा लाख क्विंटल ही बाहेर जागेवर खरेदी करण्यात आली. त्यापैकी चार लाख क्विंटल धान उचलण्यात आले असले तरी तब्बल दहा लाख क्विंटल धान सध्या बाहेर आहेत. पावसाळा तोंडावर असल्यामुळे हे धान लवकरात लवकर उचल करायची आहे आणि त्यामुळेच आतापर्यंत उन्हाळी धानाची खरेदी सुरू झाली नाही. उद्यापासून उन्हाळी धान खरेदी करण्याचे आदेश दिले असून हे धान खरेदी करून शाळा आणि समाज मंदिरांमध्ये ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे यावेळेस नाना पटोले यांनी सांगितले.
व्यापारीवृत्तीचे लोक राजकारणात आल्यामुळे शेतकऱ्यांना अन्याय -
केंद्रात आणि राज्यात व्यापारी वृत्तीचे लोक आल्यानेच शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. शासक हा व्यापारी असल्यास नागरिकांची लूट तर होणारच. मात्र तरीही व्यापारी वृत्तीचा राजकारणी लोकांपासून आम्ही शेतकर्यांचा बचाव करणार आहोत. स्वतः सत्तेत असूनही राज्यात व्यापारी वृत्तीचे लोक आल्याचा आरोप त्यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे व्यापारी वृत्तीचे नेमके हे लोक कोण याविषयी आता चर्चा सुरू आहे.
सरकार बेशर्म सारखे वागत आहे -
पेट्रोल दरवाढ करणारी ही बेशरामांची सरकार आहे. सध्या पेट्रोल 100 रुपयाच्या वर गेला असून डीजल 92 रुपये पर्यंत गेलेला आहे. असे असतानाही विरोधी पक्ष शांत बसले असल्याने त्यांनाही ही दरवाढ अपेक्षित आहे का असे विचारले असता भाजपा शासन हे बेशरामांचे शासन आहे. आम्ही याचा या पहिले ही विरोध केला आहे. मनमोहन सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे दर जास्त तर पेट्रोलचे दर कमी होते. आज कच्च्या तेलाचे दर कमी असूनही पेट्रोलचे दर आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पण ही दरवाढ करणारी भाजपा शासन मात्र बेशर्म सारखे वागत असल्याने त्यांना विरोधकांचा विरोध ही दिसत नसल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - ''महाज्योति' विरोधात षडयंत्र करत ओबीसीच्या मुलांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरू'