ETV Bharat / state

Bhandara ZP President Election : भाजप राष्ट्रवादीची युती; राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून आम्ही : नाना पटोलेंचा गौप्यस्फोट

author img

By

Published : May 11, 2022, 12:36 PM IST

Updated : May 11, 2022, 12:47 PM IST

राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि भाजपासोबत गटबंधन केले. त्यामुळे आम्ही आज त्यांना सत्तेपासून दूर ठेवले, असा गौप्यस्फोट कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी आज भंडारा येथे केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी ( Bhandara ZP President Election ) झालेल्या निवडणुकी नंतर ते माध्यमांशी बोलत ( Nana Patole on NCP ) होते.

Bhandara ZP President Election
नाना पटोले

भंडारा - राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि भाजपासोबत गटबंधन केले. त्यामुळे आम्ही आज त्यांना सत्तेपासून दूर ठेवले, असा गौप्यस्फोट कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी आज भंडारा येथे केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी ( Bhandara ZP President Election ) झालेल्या निवडणुकी नंतर ते माध्यमांशी बोलत ( Nana Patole on NCP ) होते. भंडारा जिल्हा परिषदमध्ये 52 पैकी 21 जागा जिंकून कॉंग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता. मात्र अध्यक्ष पद मिळवण्यासाठी त्यांना आणखी 5 सदस्यांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी भाजपाचे नाराज नेते आणि माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटातील 5 आपल्या सोबत घेऊन अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली.

नाना पटोले पत्रकार परिषदेत म्हणाले की, 'आम्ही मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संपर्क केला होता. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले आणि पंचायत समितीच्या अध्यक्ष -उपाध्यक्ष निवडणुकी दरम्यान भाजपशी हात मिळवणी करीत आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. गोंदिया आणि भंडारामध्ये ज्या पद्धतीने भाजपा सोबत राष्ट्रवादी सत्ता स्थापन करीत आहे. त्यावरून राष्ट्रवादीची भूमिका नेमकी काय आहे, हे स्पष्ट होत आहे.

नाना पटोले, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

...आणि सत्ता स्थापन करण्याचा मार्ग सुकर झाला - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षानी सत्ता स्थापनेसाठी दावेदारी प्रस्तुत केली असून ह्यासाठी आपल्या राजकीय वैरीभाजपची मदत घ्यायला दोन्ही पक्ष समोर आले होते. विशेष म्हणजे भाजपचा एक गट हा काँग्रेसचा जवळीक आहे. तर दूसरा गट राष्ट्रवादी काँग्रेसचा जवळ आहे. काँग्रेसकडे 21 सदस्य आहे त्यांना जर चरण वाघमारे यांचे गटातील 5 सदस्यांनी मदत केली त्यामुळे त्यांचे संख्याबळ 26 झाले आणि त्यांचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग सुकर झाला. आम्ही भाजपाशी कधीही युती केली नाही, आज आम्ही चरण वाघमारे यांच्या विकास फाउंडेशनच्या सोबत केले असून भाजपाने त्यांच्यावर अन्याय केल्यानेच ते आज आमच्या सोबत असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांकडून नानांना विरोध - भंडारा जिल्हा परिषदेत आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडीसाठी अटीतटीची लढाई झाली. जिल्हातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. कुठल्या पक्षाला स्पष्ठ बहुमत नसल्याने कोणत्या पक्षाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून येतो या कडे संपूर्ण जिल्हाचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे 52 सदस्यीय जिल्हा परिषदेत काँग्रेस चे सर्वाधिक 21 निवडून आलेले उमेदवार असलेला पक्ष होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस 13 सदस्य निवडणूक आणून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. आघाडी धर्मानुसार हे दोन्ही पक्ष मिळून सत्ता स्थापन करतील अशी अपेक्षा जिल्ह्यातील नागरिकांना होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते नाना पाटील यांचा विरोध करीत पंचायत समिती निवडणुकीत सात पैकी पाच जागांवर त्यांनी भाजपाला मदत केली.

भाजपाची चरण वाघमारे यांच्यावर कारवाई - काँग्रेसला मदत करणाऱ्या भाजपाचे माजी आमदार चरण वाघमारे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या पाच जिल्हा परिषद सदस्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सहा वर्षांसाठी पक्षातून निष्काशीत केले असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदमध्ये सांगितले आहे.

हेही वाचा - Bhandara Z.P. President : भाजपाच्या मदतीने काँग्रेसने मिळवले जिल्हा परिषद अध्यक्षपद; उपाध्यक्षपद भाजपाकडे

Last Updated : May 11, 2022, 12:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.