भंडारा : एका विवाहित महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या (Mother Suicide With Daughters) केली. ही घटना आज 15 रोजी सकाळी उघडकीस (mother suicide by jumping into river) आली. दिपाली शितल खंगार (वय 28) असे या महिलेचे तर देवांशी (साडेतीन वर्ष) व वेदांशी (वय दीड वर्षे) असे मृत माय-लेकींचे नावे आहेत.
नदीत उडी घेऊन आत्महत्या -जिल्ह्यातील भंडारा तालुक्यात येत असलेल्या वैनगंगा नदी काठावरील तिड्डी या गावातील ही घटना आहे. 14 च्या रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. सकाळी दहा वाजता तरंगणारे तीनही मृतदेह नागरिकांना दिसताच, याची माहिती कारधा पोलिसांना देण्यात (suicide into river in bhandara) आली.
आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट - पोलीस निरीक्षक थोरात व तहसीलदार अरविंद हिंगे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. मात्र आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. मृतदेह सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठवले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत. दोन चिमुकल्यासह आईने केलेल्या या आत्महत्येमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत (mother suicide) आहे.