ETV Bharat / state

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी नवीन जागेवर भरवला बाजार, मात्र तरीही ग्रहकांची गर्दी 'जैसे थे'च - कोरोना भीती

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी गर्दी टाळावी या हेतूने जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन योजना आखल्या. याअंतर्ग बाजारपेठेतील बाजार नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी भरवण्यात आला. तसेच त्यासाठी चुन्याने चौकोन आखले. मात्र, नागरिकांची गर्दी कमी झाली नाही तर, भाजी दुकानदारांनी, ठरवून दिलेल्या जागी दुकान न लावता वाट्टेल त्या ठिकाणी दुकान लावले.

ग्रहकांची गर्दी 'जैसे थे'च
ग्रहकांची गर्दी 'जैसे थे'च
author img

By

Published : Mar 26, 2020, 9:14 AM IST

भंडारा - जिल्ह्यातील किराणा आणि भाजीपाला दुकानात येणाऱ्या ग्राहकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्राहकांनी शिस्तीत राहावे यासाठी बुधवारपासून, बाजार पेठेतील बाजार गावाबाहेरील उघड्या मैदानावर भरविण्यात आले. तर, किराणा, दूध आणि औषधांच्या दुकानात 1 मीटरचे अंतर ठेवण्यासाठी मार्किंग केली गेली. मात्र तरीही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली, नागरिक आवशक्यतेपेक्षा जास्त किराणा खरेदी करतांना दिसले. तर, सायंकाळी 5 नंतर बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी सोशल डिस्टन्स राखावा, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला लक्षात घेत भंडारा जिल्हाधिकारी यांनी लोकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतांना गर्दी करू नये, एकमेकांपासून 1 मीटरचे अंतर ठेवावे. या दृष्टीने बुधवारपासून दोन नवीन योजना आखल्या. यामध्ये, भाजीपाला खरेदीसाठी वस्तीत असलेल्या भाजी दुकानात नागरिक मोठी गर्दी करत असल्यामुळे हे भाजी दुकान शहराच्या दसरा मैदान आणि रेल्वे मैदान या ठिकाणी भरविण्यात आले. त्यासाठी एक फुटाच्या नंतर 4 बाय 8 फुटांचे चुन्याने चौकोन आखण्यात आले.

अपेक्षा ही होती की या खुल्या मैदानात बाजार भरला तर गर्दी होणार नाही, नागरिक एकमेकांपासून दूर राहून व्यवहार करतील. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळे होते. भाजी दुकानदार आखून दिलेल्या जागेव्यतिरिक्त वाट्टेल त्या जागेत बसले आणि सायंकाळ नंतरच घरून बाहेर निघत लोकांनीही खूप गर्दी केली. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हाधिकारी यांचे प्रयत्न लोकांनी असफल केले आहेत. तसेच किराणा दुकानात ठराविक अंतरावर मार्किंग कारवाई, असे आदेश काढूनही दुकानदारांनी या विषयाकडे दुर्लक्ष केले. शेवटी ही बाब गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना लक्षात येताच त्यांनी या दुकान मालकाला मार्किंग काढण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर लोकांना ठराविक अंतरावर ठेवूनच किराणा देण्यात आला.

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहील हे सांगितले असतानाही लोक वाजवीपेक्षा ज्यास्त साठा खरेदी करताना दिसले. एकंदरीत प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासन कितीही प्रयत्न करत असले तरी, जोपर्यंत नागरिक जागरूक होणार नाही तोपर्यंत कोरोनाच्या भीतीचे सावट आपल्यावर नेहमीच राहणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.