ETV Bharat / state

लॉकडाऊनचा बळी : चंद्रपूरहून मध्येप्रदेशकडे निघालेल्या कामगारावर काळाचा घाला,  दोन दिवसांच्या पायपीटीनंतर मृत्यू

कोरोनामुळे संचारबंदी सुरु झाली. कामधंदा बंद असल्याने दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडली. त्यामुळे चालत का होईना आपापले घर गाठावे या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यात रोजंदारीसाठी आलेले कुटुंब मध्यप्रदेशातील आपल्या गावी निघाले. पण, वाटेतच त्यातील एकाचा मृत्यू झाला.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Apr 3, 2020, 8:21 PM IST

भंडारा- जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे अनेक कामगार वेगवेगळ्या ठिकाणी अडकून आहेत. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातून मध्यप्रदेशला चालत निघालेल्या एका कामगाराचा भंडारा जिल्ह्यातील सोकोली तालुक्यात मृत्यू झाला.

मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील अतरी गावात राहणारा धर्मपाल दुबे पाचे( वय 55 वर्षे) व्यक्ती पोटाची खळगी भरण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही गावात मजूरी करत होता. मात्र, संचारबंदीनंतर दोन वेळच्या जेवणाचीही अडचण भासू लागली. मजुरांनी जिथे आहात तिथेच राहावे, आम्ही तुमच्या जेवणाची व्यवस्था करू राहण्याची व्यवस्था करू, असे शासनाने दिले. धर्मपाल सुद्धा होता त्या ठिकाणी नऊ दिवस राहिला. मात्र, दररोज निर्माण होत असलेल्या अडचणीमुळे जगावे की मरावे हाच प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झाला होता. शेवटी 1 एप्रिलला त्याने परत मध्यप्रदेशला त्याच्या गावी जाण्याचा निर्णय घेतला.

1 एप्रिलला धर्मपाल, त्याचा मुलगा, सून आणि तीन वर्षांची नात तसेच गावातील इतर 6 सहकारी मिळून सिंदेवाही वरून मध्यप्रदेशला जाण्यासाठी पायीच प्रवास सुरू केला. ही पायपीट करून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 एप्रिलच्या रात्री त्यांनी साकोली तालुक्यातील सानगडी हे गाव गाठले. मात्र, तिथे शासकीय सेंटरमध्ये राहण्याची व्यवस्था नसल्याने ते सेंदुरवाफा येथे पोहोचले.

तिथे पोहोचल्यानंतर या लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर रात्रीचे जेवण देऊन ग्रामपंचायतमध्ये त्यांची झोपण्याची व्यवस्था करण्यात आली. सकाळी सर्व जण पुढचा प्रवास करण्यासाठी उठले. मात्र, धर्मपाल झोपूनच राहिला. शेवटी डॉक्टरांना बोलावून त्याची तपासणी केली. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

संचारबंदीच्या काळात जवळपास अडीचशे ते तीनशे किलोमीटर पायी जावे लागणार असल्याने घरी पोहोचू की नाही? या ताणावाने, सतत दोन दिवस चालले होते. वाटेतच धर्मपालचा मृत्यू झाला, हा मृत्यू नेमका कासा झाला, याचे उत्तर शवविच्छेदन अहवालानंतरच पुढे येईल.

आणखी किती धर्मपाल जीव वाचविण्याच्या धडपडीत मरतील? असा प्रश्न त्यांचे कुटुंबाच्या देहबोलीतून विचारले जात होते. विदेशातून श्रीमंतांना परत आणण्यासाठी शासनाने जशी गंभीरता दाखविली. तशी गंभीरता या मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी शासन दाखवील असती तर, असा सावल सुज्ञ करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.