ETV Bharat / state

भंडाऱ्यात कुंभार बांधवांना आधुनिक यंत्रांचे प्रशिक्षण - कुंभार

दहाड तालुक्याच्या मुंढरी गावात या १० दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणादरम्यान, मशीनद्वारे माती मिश्रण आणि माती चोळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणानंतर ४० प्रशिक्षणार्थींना प्रत्येकी मशीनही देण्यात आली. तसेच भांडे बनवण्यासाठी पॉटर व्हील देण्यात आले.

मातीची भांडी बनवताना कुंभार
author img

By

Published : Feb 9, 2019, 4:05 PM IST

भंडारा - कुंभाराच्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकरणाची जोड देण्यासाठी जिल्ह्यातील कुंभार बांधवांना आधुनिक यंत्र सामुग्री आणि प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. खादी ग्राम उद्योगाच्या माध्यमातून हे काम करण्यात येत आहे. आधुनिक यंत्रसामुग्री आणि गोष्टी शिकायला मिळत असल्याने कुंभार बांधवांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे.

जुन्या काळात मातीच्या भांड्यांना मोठी मागणी होती. या मातीच्या भांड्यांना पर्याय मिळू लागल्याने हळूहळू ही मागणी कमी झाली. त्यामुळे कुंभार समाजाचा व्यवसाय डबघाईस आला. या व्यवसायाला आधुनिकरणाची जोड मिळावी आणि आधुनिक यंत्राच्या साह्याने आधुनिक सामुग्री बनवता यावी, यासाठी जिल्ह्यात १० दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.

भंडारा आणि गोंदिया या २ जिल्ह्यातील ४० लोकांना हे प्रशिक्षण देण्यात आले. दहाड तालुक्याच्या मुंढरी गावात या १० दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणादरम्यान, मशीनद्वारे माती मिश्रण आणि माती चोळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणानंतर ४० प्रशिक्षणार्थींना प्रत्येकी मशीनही देण्यात आली. तसेच भांडे बनवण्यासाठी पॉटर व्हील देण्यात आले. हे पॉटर व्हील स्वयंचलित आहे. आधुनिक साहित्यामुळे कुंभार बांधवांच्या वेळेची बचत होईल आणि अतिशय उच्च प्रतीचे मातीचे भांडे यामधून तयार होतील. या प्रशिक्षणात या कुमार बांधवांना नव्याने ताट, कप, पॉट, शिल्पाकृती हे शिकवण्यात आले.

undefined

कुंभार बांधव आधी पारंपारिक भांड्यांची निर्मिती करून स्थानिक बाजारात त्याची विक्री करायचे. आधुनिक यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने तयार केलेले नवनवीन भांडे शिल्पाकृती विक्रीसाठी प्रदर्शनी आणि मेळाव्यात ठेवले जाणार आहेत. बाजारपेठ मिळाल्यामुळे त्यांच्या भांड्यांना चांगले दर आणि मागणीही मिळणार आहे. त्यामुळे खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमातून येत्या काळात कुंभारांची आर्थिक परिस्थिती उंचावेल, असा विश्वास खादी ग्रामोद्योगच्या अधिकाऱ्यांनी आणि प्रशिक्षण घेतलेल्या कुंभार बांधवांनीही व्यक्त केला.

Intro:स्क्रिप्ट मोजो ने पाठविली Body:आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.