ETV Bharat / state

भंडाऱ्यात मुसळधार! तीन तालुक्यात अतिवृष्टी, गोसे धरणाचे 33 दरवाजे उघडले - पवनी

शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये पवनी तालुक्यात सर्वाधिक 269 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर साकोलीत 80.4 आणि लाखांदूरमध्ये 91.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे गोसे धरणाचे 33 ही दरवाजे उघडण्यात आले आहेत.

भंडाऱ्यात मुसळधार
author img

By

Published : Aug 3, 2019, 4:02 PM IST

भंडारा- जिल्ह्यात शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये पवनी तालुक्यात सर्वाधिक 269 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर साकोलीत 80.4 आणि लाखांदूरमध्ये 91.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे गोसे धरणाचे 33 ही दरवाजे उघडण्यात आले आहेत. यापैकी 22 दरवाजे हे अर्धा मीटर तर अकरा दरवाजे हे एक मीटरने सुरू केले आहेत. यामधून 4613 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

भंडाऱयात मुसळधार

शुक्रवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. मात्र, रात्री बारानंतर पावसाने पवनी तालुक्यात तांडव केला. रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने तब्बल 269 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजलेला आहे. शेतात सर्वत्र पाणीचं पाणी दिसत आहे. या पावसाच्या पाण्यामुळे नागपूर रोड बंद पडलेला आहे. मरु नदीला आलेल्या पुरामुळे हा मार्ग बंद झाला आहे.

पवनी तालुक्यातील जवळपास 25 ते 30 गावाशी संपर्क तुटला आहे. पवनी तालुक्यातील पहाडी वर भूस्खलन होत आहे. तर एका पोल्ट्री फार्ममध्ये सात ते आठ फूट पाणी शिरल्याने जवळपास 100 ते 150 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. आसगाव येथील चाळीस घरांमध्ये पाणी शिरले आहे. वलनी गावात 5 घरात पाणी शिरले आहे. तर कोंढा गावातही घरात पाणी शिरल्याने लोकांचे नुकसान होत आहे. पवनी तालुक्यातील अमन नगर पाण्याखाली आलेला आहे. बामणी सावरला या गावांमध्येही पाणी शिरलेला आहे. बोरगाव जवळील नाल्यावर पूर आल्याने पवनी ते लाखांदूर मार्गही बंद करण्यात आलेला आहे. मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्यात वाढ झाल्यामुळे धरणाचे 33 दार उघडण्यात आले आहेत. मागील एका आठवळ्यात तब्बल 3 वेळा पवनी तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.

Intro:Body:Anc : भंडारा जिल्ह्यात काल रात्री झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांमध्ये अतिवृष्टी झाली यामध्ये पवनी तालुक्यात सर्वाधिक 269 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर साकोली मध्ये 80.4 आणि लाखांदूर मध्ये 91.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे गोसे धरणाचे 33 ही दार उघडण्यात आले असून यापैकी 22 दार हे अर्धा मीटर तर अकरा दार हे एक मीटरने सुरू केले गेले आहेत यामधून 4613 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.
काल दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती मात्र रात्री बारानंतर पावसाने पवनी तालुक्यामध्ये तांडव केला रात्रभर मुसळधार पाऊस बरसल्याने तब्बल 269 मिलिमीटर पावसाची नोंद झाली या पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजलेला आहे. शेतात सर्वत्र पाणीचं पाणी दिसत आहे. जणू पवनी तालुक्यात सर्वत्र फक्त तलावच आहेत. या पावसाच्या पाण्यामुळे नागपूर रोड बंद पडलेला आहे मरू नदी ला आलेल्या पुरामुळे हा मार्ग बंद झालेला आहे. तसेच पवनी तालुक्यातील जवळपास 25 ते 30 गावाशी संपर्क तुटलेला आहे पवनी तालुक्यातील पहाडी वर भूस्खलन होत आहे. तर एका पोल्ट्री फार्म मध्ये सात ते आठ फूट पाणी शिरल्याने जवळपास 100 ते 150 त्यादिवशी कोंबड्याचा मृत्यू झाला आहे. आसगाव येथील चाळीस घरांमध्ये पाणी शिरले आहे. वलनी गावात 5 घरात पाणी शिरले आहे, तर कोंढा गावातही घरात पाणी शिरल्याने लोकांचे नुकसान होत आहे. पवनी तालुक्यातील अमन नगर पाण्याखाली आलेला आहे. बामणी सावरला या गावांमध्येही पाणी शिरलेला आहे. बोरगाव जवळील नाल्यावर पूर आल्याने पवनी ते लाखांदूर मार्गही बंद करण्यात आलेला आहे. मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्यात वाढ झाल्यामुळे धरणाचे 33 दार उघडण्यात आले आहेत त्यापैकी 22 अर्धा मीटरने तर 11 दार एक मीटरने उघडण्यात आले असून 4713 क्युमेक्स पाणी या मधून विसर्ग होत आहे.
पावसामुळे झालेल्या नुकसानाचे सुरुवातीचे आकडे असून पुढच्या काही वेळा मध्ये अजून बरेच नुकसान झालेले आहे त्याची माहिती पुढे येईल मागील वीस-पंचवीस दिवसापासून वरुण राजा नाराज होता. मात्र मागील एका आठवळ्यात तब्बल 3 वेळा पवनी तालुक्यात अतिवृष्टी झाली आणि रात्री तर एवढी मोठी कृपा केली त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.