भंडारा - जंतनाशक मोहिमेसाठी हाफकिन बायो फार्मास्यूटिकल कंपनीतर्फे पाठवलेल्या 3 लाख 98 हजार 128 एल्बेंडाजोल हे जंतनाशक दोषपूर्ण आढळले. जिल्ह्यातील एल्बेंडाजोलचा औषधांचा सर्व साठा परत पाठवण्यात आला आहे.
कोट्यवधी रुपयांची औषधे परत बोलवण्याची नामुष्की हाफकिन बायो फार्मास्यूटिकल कंपनीवर आली आहे. राज्यात शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा करण्याचे काम हाफकिन बायो फार्मास्यूटिकल या कंपनीला देण्यात आले आहे. अनेक शासकीय रुग्णालयांत औषधांचा तुटवडा आहे. जंतनाशक औषध पुरवठा करण्याचे काम हाफकिन कंपनीने मुंबई येथील फ्रीडम फार्मास्यूटिकला दिले. त्यांनी औषधांचा पुरवठा केला मात्र. औषधाच्या पुर्नचाचणीत त्यात दोष आढळला. त्यामुळे औषधात न वापरता मुंबईला परत बोलवण्यात आले आहे.
हेही वाचा - अमरावती : ऑक्सीजन पार्कजवळ धावती कार पेटली
भंडाऱ्यात इतर जिल्ह्यातून जंतनाशक गोळ्या मागवून जंतनाशक मोहिम यशस्वी राबवण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. हाफकिन कंपनीला औषधांचा पुरवठा करण्याचे कंत्राट जेव्हापासून देण्यात आले तेव्हापासून बरेच विवाद पुढे आले. मात्र, तरीही याच कंपनीकडे औषध पुरवठ्याचे काम का सुरू ठेवण्यात आले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.