भंडारा - गोंदिया जिल्ह्यातील महिलेवर मदतीच्या बहाण्याने गोंदिया आणि भंडारा या दोन जिल्ह्यात सामुहिक अत्याचार झाल्याची घटना पुढे आली आहे. पिडीतेला आधी गोंदिया जिल्ह्यात अत्याचार करण्यात आला नंतर भंडारा जिल्ह्यात सोडण्यात आले तर भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह परिसरात महिलेवर पुन्हा दुसऱ्या दोन नराधमाणे अमानुष पद्धतीने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. महिलेची प्रकृती नाजूक असून नागपुरातील मेडिकलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
गोंदिया जिल्ह्यत झाला पहिला अत्याचार: ही महिला गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. तीला पतीने सोडून दिलेले आहे. ती तिच्या बहिणीच्या घरी राहायची. ३० जुलै रोजी तिचा बहिणीसोबत किरकोळ वाद झाला. रागाच्या भरात तिने घर सोडले आणि माहेरी जाण्यासाठी निघाली. पायी जात असतांना एका नराधमाणे मदतीच्या बहाण्याने आपल्या चारचाकी मध्ये बसविले आणि त्यानंतर तिच्यावर तब्बल दोन दिवस बलात्कार केला. ३१ जुलै रोजी पळसगाव येथे अत्याचार करून जंगलात सोडून दिले.
धाब्यावर पुन्हा दोघांचा अत्याचार : जंगलात भटकत ही महिला १ ऑगस्ट रोजी भंडारा शहराजवळील कान्हालमोह येथील धर्मा ढाबा येथे आली. तिला एकटी पाहून एक व्यक्ती तिच्याजवळ आला. ‘घरी नेऊन सोडतो,’ असे म्हणाला. पण, महिलेला त्याच्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा दुसऱ्या व्यक्तीने विश्वास दिल्यावर महिला सोबत जाण्यास तयार झाली. त्यानंतर पहिल्या व्यक्तीसोबत दुचाकीवर बसून महिला निघाली. पण, दोघांनीही तिच्यावर शेतात नेऊन अत्याचार केला. नंतर तिथेच सोडून दोघांनीही पळ काढला.
हेही वाचा - Nilesh Rane : दीपक केसरकरांनी आपल्या औकातीत रहावं, अन्यथा...; निलेश राणेंचा थेट इशारा