भंडारा - जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेतून महाराष्ट्राच्या संघासाठी जिल्ह्यातील चार खेळाडूंची निवड झाली आहे. आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत ते 14, 17 आणि 19 वयोगटातील स्पर्धेसाठी हे खेळाडू प्रतिनिधीत्व करणार आहेत.
हेही वाचा - Ind vs Ban: ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्याला अमित शाह उपस्थित राहणार
भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा आयोजित केली गेली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून 48 संघ या स्पर्धेसाठी भंडारा जिल्ह्यात आले होते. तीन दिवस झालेल्या स्पर्धेत क्रीडा संचालनालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या निवड समिती सदस्यांकडून महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यात आला आहे. या संघांमध्ये 17 वर्ष वयोगटातील मुलाच्या संघात अजय गिरी तर 14 वर्षीय मुलींच्या या संघात ट्विंकल लांबट, 17 वर्षीय मुलींच्या संघात मेघा उके आणि 19 वर्षीय मुलींच्या संघात शितल नखरिया अशा या 4 खेळाडूंची निवड झाली आहे.
संघ पुढील प्रमाणे -
14 वर्ष वयोगट मुले - अरसलान शेख- हिंगोली, हर्षल ठाकरे- वर्धा, अल तमेश खान फैय्याज खा- हिंगोली, संकेत तायडे- अमरावती, ओमकार कहार -पुणे, प्रथमेश सिंग -ठाणे, सय्यद राहील -लातूर, ओम चव्हाण -अमरावती, सार्थक राठोड- वर्धा, अथर्व होले - पुणे.
17 वर्ष वयोगट मुले - प्रज्वल बोरकर- पुणे, गौरव बागल- रायगड, अभिषेक खोत -कोल्हापूर, यश डीखोडकर -बुलढाणा, सुशांत खोमणे -पुणे, अनिकेत निंबाळकर -नाशिक, पुरुषोत्तम सिंग- ठाणे, अभिषेक टिकेकर -पुणे, योगेश प्रजापती- वर्धा, चिराग वानखेडे- अमरावती.
19 वर्ष वयोगट मुले - संकेत राकडे -अमरावती, अभिषेक खैरनार- नाशिक, आयुष दळवी- पुणे, निखिल अंबागडे- वर्धा, उज्वल खेकडे -अमरावती, रोहन सांगळे -बुलढाणा, अजय गिरी -भंडारा, शोएब शेख- औरंगाबाद, सचिन भगत- लातूर ,गौरव जगताप; पुणे.
14 वर्ष वयोगट मुली - ज्योती दोरगे- पुणे, प्रतिक्षा गवळी- पुणे, अनुष्का सिंग-ठाणे, हर्शी शर्मा- ठाणे, भूमिका सूर्यवंशी-लातूर, लक्ष्मी तायडे- अमरावती, आर्या राऊत- वर्धा, देवयानी भरारे- यवतमाळ, आर्या वाईकर- पुणे, ट्विंकल लांबट- भंडारा.
17 वर्ष वयोगट मुली - चेतना खंगरे- पुणे, सानवी पवार- ठाणे, मेगा उके- भंडारा, गुरुपीत धांदे- नागपुर, श्रावणी जाधव- रायगड, प्रीती कदम-पुणे, रोहिणी होटे- वर्धा, प्रणाली भोसले-सांगली, श्रद्धा गुवर- ठाणे, साई उपकारे- नाशिक.
19 वर्ष वयोगट मुली - प्रियंका देवरे- नाशिक, शीतल नखरिया- भंडारा, श्रद्धा मोरे- पुणे, गौरी तायडे- अमरावती, आफरिन शेख- औरंगाबाद, सारिका पाटील-कोल्हापूर, आचल धाडसे- वर्धा, ऋषिका श्योरान- मुंबई, वैष्णवी यादव- लातूर, आरती यादव- ठाणे यांचा समावेश आहे.
हे खेळाडू आंधप्रदेशच्या वेस्ट गोदावरी मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धे साठी महाराष्ट्राचा प्रतिनिधीत्व करणार आहेत या सर्वांना जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.