ETV Bharat / state

चार महिन्यानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्या दहाच्या आत - bhandara corona death

भंडारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे.मागील पाच दिवसांमध्ये भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाने एकही मृत्यू झालेला नाही. एप्रिल महिन्यात एकाच दिवशी कोरोना संसर्गाने दगावणाऱ्या लोकांची संख्या 40 पर्यंत पोहचली होती. आत्ता कोरोना संसर्गाने दगावणाऱ्या रूग्णांचा मृत्यूदर 1.78 टक्के एवढा उरलेला आहे.

भंडारा जिल्ह्यातील कोरोनाची माहीती
भंडारा जिल्ह्यातील कोरोनाची माहीती
author img

By

Published : Jun 10, 2021, 9:09 AM IST

भंडारा- चार महिन्यानंतर पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकेरी आकड्यावर आलेली आहे. मंगळवारी 9 तर बुधवारी 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 5 जून पासून एकाही व्यक्तीचा कोरोना संसर्गाने मृत्यू झालेला नाही. 4 जून रोजी जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह दर 7.43 टक्के एवढा होता. जो कमी होऊ बुधवारी 0.37 टक्के एवढा राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भंडारा जिल्हा कोरोनामुक्त होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

1600 पर्यंत पोहोचली होती रुग्णसंख्या

10 फेब्रुवारी रोजी भंडारा जिल्ह्यात 6 कोरोना रुग्ण आढळले होते. त्यानंतर ही संख्या दरदिवशी वाढतच गेली. एप्रिल महिन्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या सोळाशे पर्यंत जाऊन पोहोचली होती. मे च्या सुरुवातीनंतर रुग्णसंख्या हळूहळू कमी होत आली. ८ जून ला म्हणजे चार महिन्यानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्या एकेरीवर आली. मंगळवारी रुग्णसंख्या 9 होती तर बुधवारी 7 लोक कोरोना पॉझिटिव्ह आलेत. ही कमी झालेली रुग्णसंख्या जिल्ह्यासाठी समाधानकारक आहे त्यामुळे येत्या काही दिवसात भंडारा हा कोरूनामुक्त होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र त्यासाठी शासनाने घालून दिलेले नियम काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नागरीकांवर आहे.

मागील पाच दिवसात एकही मृत्यू नाही

केवळ कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे, असे नाही तर मृतांची संख्या ही कमी झालेली आहे. मागील पाच दिवसांमध्ये भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाने एकही मृत्यू झालेला नाही. एप्रिल महिन्यात एकाच दिवशी कोरोना संसर्गाने दगावणाऱ्या लोकांची संख्या 40 पर्यंत पोहचली होती. आत्ता कोरोना संसर्गाने दगावणाऱ्या रूग्णांचा मृत्यूदर 1.78 टक्के एवढा उरलेला आहे.

शासनाच्या नियमानुसार जिल्ह्या पूर्ण अनलॉक होऊ शकतो

सोमवारपासून महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे अनलॉक केले जात आहेत. त्यासाठी शासनाने काही टप्पे पाडले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच टक्‍क्‍यांपेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यात पूर्णपणे लॉकडाऊन उघडला गेला आहे. शासनाच्या नियमानुसार भंडारा हा तिसरा टप्पा होता कारण भंडारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येची टक्केवारी ही 7.43 टक्के एवढी होती त्यामुळे भंडारा जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन सुरू आहे. मात्र मागील दोन दिवसांमध्ये ही टक्केवारी कमी होऊन बुधवारी कोरोनाबाधित रुग्णांची टक्केवारी शून्य 0. 37% एवढीच राहिली आहे. त्यानुसार भंडारा पुढील काही दिवसांमध्ये पूर्णपणे अनलॉक होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-आज 16 हजार 379 रुग्ण कोरोनामुक्त, 10 हजार 989 नवे रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.