ETV Bharat / state

मासे चोरण्यासाठी तलावातील पाणी उपसले, मच्छीमार बांधवांचे लाखोंचे नुकसान - मत्स्यबीज

तरुणांनी तलावातील पाणी पंपाद्वारे उपसल्याने लाखो मासे मरण पावले आहेत. त्या तरुणांवर कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मच्छी पालन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

मरण पावलेले मासे
author img

By

Published : Apr 25, 2019, 9:16 PM IST

Updated : Apr 26, 2019, 12:06 AM IST

भंडारा - मासे चोरण्यासाठी गावातील तरुणांनी चक्क तलावातील पाणी पंपाद्वारे उपसल्याची घटना घडली आहे. यामुळे लाखो मासे मरण पावले आहेत. यामुळे मच्छीमार बांधवांचे लाखोंचे नुकसान झाले. त्या तरुणांवर कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मच्छी पालन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तशी तक्रारही त्यांनी पोलीस ठाण्यात दिली. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

मच्छी पालन संस्थेचे पदाधिकारी

मोहाडी तालुक्यातील कुशारी येथे जिल्हापरिषद लघु पाटबंधारे विभागाचा तलाव आहे. मासे पालनासाठी मोहाडी येथील एका संस्थेने हा तलाव पाच वर्षांसाठी लीजवर घेतला आहे. या तलावात एक लाख रुपयांचे मत्स्यबीज टाकण्यात आले होते. या तलावातील मासे मोठे झाले, की दुसऱ्या तलावात नेऊन सोडले जातात. मात्र कुशारी येथील चार ते पाच तरुणांनी तलावावर 4 इंजिन लावून पाण्याचा उपसा केला. संपूर्ण तलाव रिकामा केल्यामुळे मासे तडफडून मरण पावले. केवळ काही प्रमाणात मासे चोरण्यासाठी या तरुणांनी चक्क तलावच कोरडा केला. त्यामुळे ढिवर बांधवांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

कुशारी गावाशेजारी हा तलाव असल्याने तलावालगत असलेल्या शेतकऱयांना या तलावाचे पाणी शेतीसाठी मिळते. गावातील जनावरांना उन्हाळ्यात पाण्याची सोय होते. मात्र या तरुणांनी जी चूक केली आहे, त्याचे नुकसान केवळ मत्स्य पालन संस्थेलाच झाले नाही, तर मुक्या जनावरांनाही त्याची झळ पोहोचणार आहे. जिल्ह्यात कमी पावसाने आणि तीव्र उन्हामुळे पाण्याची पातळी खाली जात आहे. अशात या तरुणांनाचा मूर्खपणा अधिकच घातक ठरणार आहे.

शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास विमा असल्यास त्यांना नुकसान भरपाई मिळते. मात्र मत्स्य उत्पादक लोकांचे मासे मरण पावले तर त्यांना कोणतीही नुकसान भरपाई शासनाकडून मिळत नाही. त्यामुळे ज्या लोकांनी हे कारस्थान केले, त्यांच्याकडून ही नुकसान भरपाई मिळवून द्यावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार मोहाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. या तक्रारीत कुशारी येथील नारायण साकुरे, विजय समरीत, विलास दिपटे यांची नावे आहेत.

पाणी हे राष्ट्रीय संपत्ती आहे आणि जर देशाच्या संपत्तीचे कुणी, अशा पद्धतीने नुकसान करीत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी एकलव्य सेनेचे संजय केवट यांनी केली आहे.

Intro:ANC : तलावातील मासे चोरण्यासाठी गावातील तरुणांनी चक्क तलावातील संपूर्ण पाणी पंपाद्वारे फेकल्याने सर्व मासोळ्या मरणपावले असल्याने ढिवर बांधवांचे लाखोंचे नुकसान झाले असून त्या आरोपींवर कार्यवाही करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी मच्छी पालन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तशी तक्रार हि त्यांनी पोलीस स्टेशन ला दिली आहे मात्र अजूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

Body:मोहाडी तालुक्यातील कुशारी येथे जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचा तलाव आहे मासे पालनासाठी मोहाडी येथील एका संस्थेने हा तलाव पाच वर्षासाठी लीजवर घेतला आहे या तलावात एक लाख रुपयांचे मत्स्यबीज टाकण्यात आले होते या तलावातील मासे मोठे झाले की दुसऱ्या तलावात नेऊन सोडले जातात मात्र कुशारी येथील चार ते पाच तरुणांनी तलावावर 4 इंजिन लावून पाण्याचा उपसा केला. संपूर्ण तलाव रिकामा केल्यामुळे मासे तडफडून मरण पावले केवळ काही प्रमाणात मासे चोरण्यासाठी या तरुणांनी चक्क तलाव कोरडे केले त्यामुळे या ढिवर बांधवांचा लाखोंचे नुकसान झाला आहे.

कुशारी गावाच्या शेजारी हा तलाव असल्याने गावातील तालावलागत असलेल्या शेतकऱयांना या तलावाचे पाणी शेती साठी मिळते, गावातील जनावरांना उन्हाळ्यात पाण्याच्या सोय होते मात्र या तरुणांनी जी चुकी केली आहे त्याचा नुकसान केवळ मत्स्य पालन संस्थेलाच झाले नाही तर मुक्या जनावरांनाही त्याची झळ पोहचणार आहे. कारण जिल्ह्यात कमी पावसाने आणि तीव्र उन्हामुळे पाण्याची पातळी खाली जात आहे आणि अश्यात या तरुणांनाचा मूर्खपणा अधिकच घातक ठरणार आहे.

शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसन झाल्यास त्याचा विमा असल्यास त्याला नुकसानभरपाई मिळते मात्र मत्स्य उत्पादक लोकांचे मासे मरण पावले तर त्यांना कोणतीही नुकसानभरपाई शासनाकडून मिळत नाही त्यामुळे ज्या लोकांनी हे कारस्थान केले आहे त्यांच्या कडून ही नुकसान भरपाई मिळून दयावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी तक्रार मोहाडी पोलीस स्टेशनला दिली आहे, या तक्रारी नुसार कुशारी येथील नारायण साकुरे, विजय समरीत, विलास दिपटे यांची नावे आहेत.
पाणी हे राष्ट्रीय संपत्ती आहे आणि जर देशाच्या संपत्तीचा कोणी अश्या पद्धतीने नुकसान करीत असल्यास त्याच्यावर कार्यवाही व्हायला हवी अशी मागणी एकलव्य सेनेचे संजय केवट यांनी केली आहे.
बाईट : संजय केवट, एकलव्य सेना, प्रदेशाध्यक्ष
सहदेव मारबते, मत्स्य पालन संस्था, मोहाडी

Conclusion:
Last Updated : Apr 26, 2019, 12:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.