ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी, 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू - कोरोना अपडेट भंडारा

दिवसेंदिवस भंडारा जिल्ह्यातीलही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात आज (रविवार) 6 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. यामध्ये एका 10 महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बळी आज गेला आहे.

first corona victim death in Bhandara district
भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी, 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
author img

By

Published : Jul 12, 2020, 9:45 PM IST

भंडारा - दिवसेंदिवस भंडारा जिल्ह्यातीलही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात आज (रविवार) 6 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. यामध्ये एका 10 महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बळी आज गेला आहे.

आज आढळलेल्या 6 रुग्णांमुळे कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 170 वर पोहोचला आहे. आज पहाटे अडीच वाजण्याच्या दरम्यान 30 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या तरुणाची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसताना त्याला कोरोना झाला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

आज मिळालेल्या 6 रुग्णांमध्ये 3 रुग्ण हे मोहाडी तालुक्यातील असून भंडारा तालुक्यातील एक, तुमसर तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. तुमसर तालुक्यातील 31 वर्षीय तरुण हा कुवैतवरून आला होता. तर 45 वर्षीय पुरुष हा हावडा येथून आला होता. तर मोहाडी तालुक्यात नाशिक येथून 25 वर्षीय तरुण आणि 36 वर्षीय तरुण आले होते. तर एका दहा महिन्याच्या मुलाचाही यामध्गाये समावेश आहे. हा संशयित बालक तुमसर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. सध्या केवळ त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यानंतर त्याची आई आणि वडील यांना क्वारंटाईन केले आहे. त्यांच्या घश्याचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत. तर त्यांच्या गावातील सर्व लोकांच्या आरोग्याची तपासणी उद्या केली जाणार आहे. या 10 महिन्याच्या मुलाला कोरोना झाल्यामुळे, सध्या गावात प्रशासकीय अधिकारी कर्मचारी माहिती गोळा करत आहेत. तर सहावा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल हा भंडारा तालुक्यातील आहे. या 30 वर्षीय तरुणाचा अहवाल येण्याअगोदरच मृत्यू झाला होता.

रविवारी सकाळी 4 वजाता भंडारा शहरातील रहिवासी असलेला 30 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने प्रशासनात एकच खडबड उडाली आहे. विशेष म्हणजे मृताची कोणतीच ट्रॅव्हल हिस्ट्री नसताना त्याला कोरोनाची लागण कोठून आणि कशी झाली याचा शोध घेण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. हा तरुण एका खासगी डॉक्टरकडे निमोनियाचा उपचार घेत होता. डॉक्टरच्या सल्ल्यावरून त्यांनी शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या टेस्टसाठी गेला असता त्याला कोरोना वार्डमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले.

या तरुणावर 9 तारखेपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. तोपर्यंत त्याचा कोरोना अहवाल आला नव्हता. त्याच्या मृत्यूनंतर प्रशासनाने त्याचा अहवाल तातडीने मागून घेतला, जो पॉझिटिव्ह निघाला. जिल्ह्यतील कोरोनाचा हा पहिला मृत्यू असून, हा मृत्यू शहरातील असल्याने शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हाप्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा आकडा सतत वाढत असून, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही 170 वर गेली आहे. तर 85 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 84 रुग्णावर उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.