भंडारा - स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्ताने आज संपूर्ण देशात राष्ट्रीय एकता दिवस आणि एकता दौड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील शहरातील पोलीस कवायती मैदानावर एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. यात पोलीस दलातील जवानांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.
एकता दौड पोलीस कवायती मैदानापासून सुरू होऊन शहरातील मुस्लीम चौक, खांब तलाव चौक, या ठिकाणांहून होत तिचा समारोप शास्त्री चौकात करण्यात आला. या अगोदर सकाळी भंडारा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी एकता दौड बरोबरच स्पर्धक आणि कर्मचाऱ्यांबरोबर राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता टिकून राहण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे त्यांच्याकडून अवाहन करण्यात आले. नंतर एकता दौडला हिरवा झेंडा दाखवून तिची सुरुवात झाली. त्याचबरोबर, एकता दौडमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींना प्रोत्साहानास्पद प्रशस्ती पत्र देखील देण्यात आले.
हेही वाचा- परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी - नाना पटोले