ETV Bharat / state

Bhandara Lake : भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील तलाव फुटला; गावात पाणीच पाणी, पंधरा घरे पाण्याखाली - Due to Bursting of a Lake in Tumsar

भंडारा जिल्ह्यात ( Bhandara District ) दिवसभर ( Tumsar Taluka ) पूर्णपणे शांत असलेल्या पावसाने रात्री बारानंतर सुरुवात केली. वादळवाऱ्यासह विजेच्या गडगडाटांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तुमसर तालुक्यातील धनेगाव जंगल परिसरात रात्रीच्या सुमारास ढगफुटीसदृश ( Dhanegaon Flooded Due to Bursting of a Lake ) पाऊस झाल्याने धनेगाव जलमय झाले आहे. विद्युत प्रवाह खंडित झाल्याने लोकांना पाण्याच्या अंदाज आला नाही आणि जवळपास 15 घरांत ( 15 Houses are Under Water) पाणी शिरले.

Dhanegaon Flooded Due to Bursting of a Lake
तुमसर तालुक्यातील धनेगावात पाणी
author img

By

Published : Aug 8, 2022, 1:44 PM IST

Updated : Aug 8, 2022, 2:22 PM IST

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या ( Bhandara District ) तुमसर तालुक्यातील ( Tumsar Taluka ) धनेगाव जंगल परिसरात रात्रीच्या सुमारास ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने धनेगाव जलमय ( Dhanegaon Flooded Due to Bursting of a Lake ) झाले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. पाऊस दमदार आल्याने विद्युत प्रवाह खंडित झाला. त्यामुळे लोकांना पाण्याच्या अंदाज आला नाही आणि जवळपास 15 घरांत पाणी ( 15 Houses are Under Water ) शिरले.

पहाटे 3 वाजता फुटले तलाव : भंडारा जिल्ह्यात दिवसभर पूर्णपणे शांत असलेल्या पावसाने रात्री बारानंतर सुरुवात केली. वादळवाऱ्यासह विजेच्या गडगडाटांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विशेषतः तुमसर तहसीलमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला. तुमसर तालुक्यातील जंगल परिसरात ढगफुटीसदृश पाऊस बरसल्याने चुलहरडोह येथील जंगलातील तलाव फुटल्याने धनेगावात पाणी शिरले. संपूर्ण गावातून जणू नदी वाहू लागली होती. पहाटे तीन वाजेला गावात पाणी शिरल्याने आणि विद्युत पुरवठा बंद असल्याने लोकांना नेमका अंदाज आला नाही. मात्र, पहाट उजळल्यावर परिस्थितीचा अंदाज गावकऱ्यांना आला.

धनेगावात पाणी शिरले.

15 घरांमध्ये शिरले पाणी : या तलाव फुटीमुळे गावात सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. गावातून नदी वाहत असल्याचे दृश्य दिसत होते. यामुळे 15 घरांमध्ये पाणीही शिरले. याची माहिती तुमसर तहसीलदार यांना दिल्यानंतर बचाव पथकाला घेऊन तहसीलदार घटनास्थळी पोहोचले आहेत. ज्या 15 घरांमध्ये पाणी शिरले होते. त्या घरातील कुटुंबाला सामानासह सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, त्यांच्या राहण्याचा आणि खाण्यापिण्याची व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली आहे. तहसीलदार हे स्वतः घटनास्थळी पोहचले असून, या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सध्या कुठलीही जीवितहानी झाली नाही. परिस्थिती आटोक्यात करण्यासाठी प्रशासन कामाला लागलेले आहे.

हेही वाचा : TET Scam in Maharashtra : मला बदनाम करण्याचे षडयंत्र : टीईटी प्रश्नावर अब्दुल सत्तार यांचे स्पष्टीकरण

Last Updated : Aug 8, 2022, 2:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.