ETV Bharat / state

सावधान! कोरोना हवेमार्फत देखील पसरतो; शल्य चिकित्सकांची माहिती

कोरोना विषाणूचे संक्रमण केवळ शारीरिक संपर्काने नव्हे, तर हवेद्वारे देखील होते, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद खंडाते यांनी दिली आहे. याबाबत बोलताना त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा उल्लेख केला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी नागरिकांनी घरीच रहावे, असं आवाहन त्यांनी केलयं.

bhandara corona news
कोरोना विषाणूचे संक्रमण केवळ शारीरिक दृष्ट्या नव्हे, तर हवेद्वारे देखील होते, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद खंडाते यांनी दिली आहे
author img

By

Published : Mar 24, 2020, 7:39 AM IST

भंडारा - कोरोना विषाणूचे संक्रमण केवळ शारीरिक संपर्काने नव्हे, तर हवेद्वारे देखील होते, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद खंडाते यांनी दिली आहे. याबाबत बोलताना त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा उल्लेख केला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी नागरिकांनी घरीच रहावे, असे आवाहन त्यांनी केलयं.

कोरोना विषाणूचे संक्रमण केवळ शारीरिक दृष्ट्या नव्हे, तर हवेद्वारे देखील होते, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद खंडाते यांनी दिली आहे

सध्या संपूर्ण जिल्ह्यात कलम 144 लागू असूनही नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने सायंकाळी सहानंतर शहरातील सर्व अंतर्गत रस्ते बंद केले. तसेच जिल्हा बंदीचा आदेश दिला.

सोमवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात आढावा बैठक घेतली. तसेच कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. जिल्हा सामान्य रुग्णालयात फक्त 12 व्हेंटिलेटर होते. ही तोकडी संख्या लक्षात घेता नाना पटोले यांनी डेप्युटी डायरेक्ट यांना सांगून नवीन 5 व्हेंटिलेटर मागवले आहेत. तसेच त्यांनी नागरिकांना घरी राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

मागील काही दिवसांत विदेशातून तसेच अन्य राज्यांतून मोठ्या प्रमाणात नागरिक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या सर्वांची माहिती घेऊन जवळपास 200 लोकांना होम क्वारंटाईन केले जाणार आहे. तसेच सायंकाळपासून संपूर्ण जिल्ह्यात बंदी केली जाणार असून फक्त राष्ट्रीय महामार्ग सुरू असणार आहेत. आता पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात 30 नागरिक विदेशातून आले असून त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या पैकी 16 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर उर्वरित 14 नागरिकांना रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती शल्य चिकित्सक प्रमोद खंडाते यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.