भंडारा - अखेर आठव्या दिवशी गोसीखुर्द धरणाचे संपूर्ण 33 पैकी 33 दरवाजे उघडले गेले असून 12 दरवाजे अर्ध्या मीटरने तर 21 दरवाजे 1 मीटरने उघडले गेले आहे. संपूर्ण 33 दारातून 5955.85 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. हवामान खात्याने भंडारा जिल्ह्याला येल्लो अलर्ट दिला असून मागील 24 तासांमध्ये सात पैकी पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. नदी नाले दुथडी वरून वाहत असून तुमसर तालुक्यामध्ये सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला असून लोकांच्या घरात सुद्धा पाणी गेलेला आहे.
गोसे धरणाचे 33 ही दार उघडले गेले, जिल्ह्यात 5 तालुक्यात अतिवृष्टी , आता पर्यंत 112 टक्के पाऊसाची नोंद - भंडारा अतिवृष्टी बातमी
हवामान खात्याने भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट मागील 24 तासांमध्ये भंडारा जिल्ह्याच्या सात पैकी पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. सर्वाधिक पाऊस हा तुमसर तालुक्यात 148 मिमी, लाखांदूर 135, साकोली 115, पवनी 106, मोहाडी 90.4, लाखनी 59.4, भंडारा 16.4 मिमी पासून पडला असून आता पर्यंत 112 टक्के पासून पडला आहे.
![गोसे धरणाचे 33 ही दार उघडले गेले, जिल्ह्यात 5 तालुक्यात अतिवृष्टी , आता पर्यंत 112 टक्के पाऊसाची नोंद discharge of 5955.85 cumex water from 33 gates of gosikhurd dam due to heavy rains in bhandara](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15811997-83-15811997-1657705885443.jpg?imwidth=3840)