भंडारा - जिल्ह्यात सर्व 305 ग्रामपंचायतींचा निकाल लागला असून सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस जरी पुढे आला असला, तरी इतर पक्षातील नेतेही स्वतःच्याच पक्षाने सर्वाधिक जागा कशा मिळवल्या याचा दावा सध्या करीत आहेत. खरे तर संपूर्ण निवडणुकी कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर होत नसल्याने ठामपणे कुठल्या पक्षाचे किती सरपंच निवडून आले हे ठामपणे सांगणे शक्य नाही.
जिल्हा - भंडारा 305
काँग्रेस- 124
भाजप- 83
राष्ट्रवादी- 39
शिंदे गट - 13
ठाकरे - 04
इतर- 42
Gram Panchayat Result: भंडारा जिल्ह्यात ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व - gram panchayats in Bhandara district
जिल्हा झालेल्या तीनशे पाच ग्रामपंचात निवडणुकीचा निकाल हाती आला असून 305 पैकी 124 जागा जिंकत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे वर्चस्व कायम ठेवले आहे. तर भाजप ने 83 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला आहे. तर राष्ट्रवादी 39 जागेवर समाधानी राहावे लागले आहे. तसेच यावेळेस शिंदे गट व ठाकरे गटाची समाधान कारक कामगिरी केली असून ठाकरे गटाने 4 आणि शिंदे गटाने 13 जागा मिळविल्या आहे. तर पहिल्यादा तुमसर तालुक्यात पाथरी ग्रामपंचायत येथे आम आदमी पार्टिने खाता खोलला असून विद्या कोहळे सरपंच निवडून आल्या आहे.
भंडारा - जिल्ह्यात सर्व 305 ग्रामपंचायतींचा निकाल लागला असून सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस जरी पुढे आला असला, तरी इतर पक्षातील नेतेही स्वतःच्याच पक्षाने सर्वाधिक जागा कशा मिळवल्या याचा दावा सध्या करीत आहेत. खरे तर संपूर्ण निवडणुकी कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर होत नसल्याने ठामपणे कुठल्या पक्षाचे किती सरपंच निवडून आले हे ठामपणे सांगणे शक्य नाही.
जिल्हा - भंडारा 305
काँग्रेस- 124
भाजप- 83
राष्ट्रवादी- 39
शिंदे गट - 13
ठाकरे - 04
इतर- 42
TAGGED:
Gram Panchayat Result 2022