भंडारा - भंडारा जिल्ह्यांमध्ये आज एक आगळेवेगळे आंदोलन पाहायला मिळाले. या आंदोलनामध्ये माणसांसह जनावरांचा समावेश होता. जंगली प्राण्यांचा आणि पाळीव प्राण्यांचीही जनगणना होते. मग ओबीसीची का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत या आंदोलनामध्ये गाई, म्हशी, बकऱ्या आणि जंगली जनावरांचा प्रतिकात्मक पोशाख घालून मुले सहभागी झाले होते.
सरकार आमच्यावर कोणतेही गुन्हे लावू शकत नाही-
केंद्राने वेगळ्या जनगणनेचा ठराव फेटाळला आहे. जनगणनेत सहभागी झाले नाहीत तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल असं कायदा सांगते. मात्र जर संविधानिक पद्धतीला अनुसरून तुम्ही प्रश्नावली बनवली नाहीत आणि ओबीसीच्या कॉलम त्यात ठेवला नाही तर आम्ही त्रासून याचा विरोध करू आणि असहभाग दाखवू. असे झाल्यास सरकार आमच्यावर कोणतेही गुन्हे लावू शकत नाही. कारण शासनाने आमचे संविधानिक अधिकार डावलले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही हा मोर्चा काढला आहे. यानंतरही शासन आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असेल तर आम्ही घरोघरी पाट्या लावून आंदोलन करून, या जनगणनेचा प्रखर विरोध करू, असे आंदोलकांनी सांगितले.
हेही वाचा- शेतकरी आंदोलन आणखी तीव्र, १४ डिसेंबराला सर्व शेतकरी नेते बसणार उपोषणाला
हेही वाचा- ...अन्यथा महाराष्ट्रातही भडका उडेल; दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीवेळी राजू शेट्टींचा इशारा