ETV Bharat / state

Meet Bride and Groom for The Disabled : दिव्यागांसाठी भरला वधु-वर परिचय मेळावा, मागील पाच वर्षांपासून परंपरा कायम - Bride-and-groom introductory meet for Divyagas In Bhandara

वधु-वर परिचय मेळावा हे आपण नेहमीच ऐकले असेल. मात्र, भंडारा जिल्ह्यात एका आगळा-वेगळा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. (Meet Bride and Groom for The Disabled) हा वधू-वर परिचय मेळावा तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी नव्हता तर हा होता दिव्यांग बांधवांसाठी. (Meet Bride and Groom for The Disabled In Bhandara) मागील पाच वर्षांपासून एकलव्य सेना या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा अनोखा वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला जात आहे.

दिव्यांगांसाठी भरला वधु वर परिचय मेळावा
दिव्यांगांसाठी भरला वधु वर परिचय मेळावा
author img

By

Published : Jan 6, 2022, 8:39 AM IST

Updated : Jan 6, 2022, 9:55 AM IST

भंडारा - वधु-वर परिचय मेळावा हे आपण नेहमीच ऐकले असेल. मात्र, भंडारा जिल्ह्यात एका आगळा-वेगळा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. (Meet Bride and Groom for The Disabled In Bhandara) हा वधू-वर परिचय मेळावा तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी नव्हता तर हा होता दिव्यांग बांधवांसाठी. मागील पाच वर्षांपासून एकलव्य सेना या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून (Meet Bride and Groom for The Disabled) हा अनोखा वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला जात आहे. या परिचय मेळाव्यातून लग्नगाठ जुळत असल्याने दिव्यांग बांधवही मोठ्या संख्येने दरवर्षी या मेळाव्यात येतात.

प्रतिक्रिया

जिल्हा क्रीडा संकुलाच्या पटांगणात झाले आयोजन

भंडारा जिल्ह्यातील सामाजिक संघटना एकलव्य सेना ही दरवर्षी दिव्यांगांसाठी वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन करते. या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज संकुलामध्ये या वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले गेले होते. या आगळ्यावेगळ्या आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे.

कोरोना मुळे मोजक्या लोकांना आमंत्रित केले गेले होते

दरवर्षी या मेळाव्यामध्ये भंडारा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्हा आणि जिल्हा लगत असलेल्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील दिव्यांग (Bride-and-groom introductory meet for Divyagas) बांधव त्यांच्या आयुष्याच्या जोडीदाराची शोध घेण्यासाठी येतात. यावर्षी कोरोनाच्या नियमांमुळे केवळ 100 लोकांना या मेळाव्यात बोलवण्यात आले होते. (Meet Bride and Groom for The Disabled) यामध्ये अंध, अपंग, मूकबधिर, कर्णबधिर अशा सर्वच दिव्यांग बांधवांनी हजेरी लावली. कोणी व्हील चेयरवर येऊन तर अंध व्यक्तीने इतरांच्या मदतीने स्टेज वर येत स्वतः विषयी माहिती देत आयुष्याचा जोडीदार कसा असावा याविषयी सांगितले.

अशा आयोजनाची आम्हाला नितांत गरज आहे

2019 मध्ये मध्यप्रदेशच्या एका अंध व्यक्तीला या दिव्यांग वधु-वर परिचय मेळावा मध्ये जीवन साथीदार मिळाला. या दिव्यांग मेळाव्यामुळेच मला एक चांगली धर्मपत्नी मिळाली असून मला आत्ता सहा महिन्याची मुलगी आहे. माझं संपूर्ण आयुष्य सुखात चाललेला आहे आणि हे सर्व शक्य झाले ते या दिव्यांग वधू-वर परिचय मिळाल्यामुळेच. सर्वसामान्य व्यक्ती त्याचा साथीदार शोधण्यासाठी दूरवर जाऊ शकतो, समाजातील इतर लोकही त्यांना साथीदार मिळवून देण्यासाठी मदत करतात. मात्र, आमच्यासारख्या उपेक्षित दिव्यांगांना त्यांचा साथीदार शोधण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे अशा आयोजनाची नितांत गरज असल्याचा त्यांनी सांगितले.

सर्वसामान्यांच्या मदतीला कोणी धावतो या घटकांची मदत करून एक वेगळा आनंद मिळतो आहे

सर्वसामान्य लोकांसाठी सामूहिक विवाह सोहळे आणि हे वधू-वर परिचय मिळावे आम्ही नेहमीच आयोजित करीत होतो. मात्र, हे करीत असतांना या दिव्यांग लोकांच्या अडचणीही समजून आल्या आणि त्यामुळेच मागील पाच वर्षापासून खास दिव्यांग लोकांसाठी वधू-वर परिचय मेळावा आम्ही आयोजित करीत आहोत. विशेष म्हणजे या मेळाव्यातून लोकांना त्यांचा साथीदार मिळत असल्याने आम्हालाही या आयोजनामुळे एक मानसिक समाधान मिळतो असं आयोजकांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Sindhutai Sapkal : अनाथांच्या दु:खांवर फुंकर घालणारी माय हरपली, ईटीव्ही भारतकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

Last Updated : Jan 6, 2022, 9:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.