भंडारा - शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर मागील महिनाभरापासून धानाची भरडाईसाठी थांबलेली उचल सोमवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात धान खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून फक्त एकदा धानाची उचल केली होती. त्यामुळे गोदामं हाउसफुल झाल्याने खरेदीचे काम बंद पडले होते. तसेच अवकाळी पावसात धान भिजून शेतकऱ्यांचा मोठा नुकसानही झाले होते. मागील शासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे आणि नवीन शासन स्थानानेसाठी झालेल्या उशीरामुळे धानाची नियमित उचल झाली नाही. मात्र, आता ही उचल नियमित होणार असल्याचे तुमसर मतदारसंघाचे आमदार राजू कारेमोरे यांनी सांगितले.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : 'पीडिता व्हेंटिलेटरवर, वैद्यकीय पातळीवर प्रयत्न सुरू'
नोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यात शासकीय धान्य खरेदी केंद्र सुरू झाले. आतापर्यंत ऐकून 47 धान खरेदी केंद्र जिल्ह्यात सुरू झाले असून या धान खरेदी केंद्रामध्ये 44 हजार 731 शेतकऱ्यांनी आतापर्यंत 13 कोटी 95 लाख क्विंटल धानाची विक्री केली आहे. याची एकूण किंमत 235 कोटी 7 लाख एवढी असून, यापैकी 214 कोटी 41 लाख शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहे. 38 कोटी 65 लाख रुपयांचे शेतकऱ्यांचे बील अजूनही बाकी आहेत. यावर्षी धानाला 2 हजार 500 रुपये दर पडत असल्याने शेतकऱ्यांनी केवळ साधा धान नाही तर त्यांचा उच्चदर्जाचा धान ही शासकीय केंद्रावर विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुले खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धान येत आहेत.
गोदामं संपूर्ण भरल्याने शासकीय धान खरेदी बंद पडली आहे. त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांचा लाखो क्विंटल धान खरेदी केंद्राबाहेर पडला आहे. तीन महिने झाले धान खरेदी सुरू होऊन मात्र ढिसाळ नियोजनामुळे अजूनही अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी झालेली नाही. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याची तक्रार विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना केल्यानंतर सोमवारपासून गोदामात पडलेले धानाचे तांदूळ बनवण्यासाठी उचल केली जाणार आहे. या अगोदर फक्त भंडारा जिल्ह्यातील राईस मीलला उचल करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी धानाचे तांदूळ बनविण्यासाठी उचल करण्याची परवानगी दिल्यामुळे गोदाम खाल्ली होती आणि शेतकऱ्यांच्या धानाच्या खरेदीला पुन्हा सुरुवात होईल.
खर तर दरवर्षी धान खरेदी केंद्रावर अशा पद्धतीच्या अडचणींना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. दरवर्षी धान खरेदीचे नियोजन हे ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होते आणि नोव्हेंबर महिन्यात धान्य खरेदी केंद्र सुरू होतात. मात्र, नियोजन हे जून-जुलै पासूनच व्हायला पाहिजे. पुढच्या वर्षीपासून अशाच पद्धतीचे आम्ही नियोजन करणार असल्याचे विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांनी सांगितले.
हेही वाचा - ' मी पंढरपूरला दर्शनाला जातो.. पण त्याचे राजकारण करत नाही'