भंडारा - मला ग्रामपंचायतीपासून मंत्रिपदाच्या राजकारणाचा अनुभव आहे. या काळात मी केलेल्या कामांचा तसेच प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या काळात केलेल्या कामामुळेच मला भंडारा गोंदिया जिल्ह्यातील लोक निवडून देतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांनी दर्शविला.
पंचबुद्धे म्हणाले, प्रफुल पटेल यांनी जिल्ह्यामध्ये लोकांची कामे केली आहेत. मोठे प्रकल्प हे प्रफुल पटेल यांच्या काळात आले आहेत. यापुढेही मी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. मी भंडारा-मोहाडी विधानसभा क्षेत्रातून आमदार राहिलेलो आहे. प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून मला मंत्रिपद मिळाले होते. तेंव्हा लोकांसाठी केलेली कामे तसेच गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री असताना त्या जिल्ह्यात केलेली कामे आणि लोकांशी असलेला घनिष्ट संबंध यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील लोकांसाठी मी नवीन नाही.
रखडलेले प्रकल्प, गोसे धरण, करचखेडा लिफ्ट इरिगेशन पूर्ण करणे, लोकांच्या विकासासाठी आवश्यक योजना जिल्ह्यातील आणने याला प्राधान्य देणार आहे. मागील ५ वर्षाच्या कालावधीत या जिल्ह्यामध्ये एकही मोठा प्रकल्प आला नाही. एवढेच नाही तर जुने प्रकल्प आहेत, तेही अजून अपूर्ण आहेत. निवडणुकीच्या तोंडावर या शासनाने शेतकऱ्यांना बोनस दिला. शेतकऱ्यांची निवळ फसवेगिरी केली. भाजपने काँग्रेसच्या योजनांचे नाव बदलून जुन्याच योजना राबविल्या असल्याचा आरोप पंचबुद्धे यांनी केला. पहा सविस्तर मुलाखत..