ETV Bharat / state

भंडारा नगर परिषदेत कोरोनाचा अलर्ट.. कर्मचाऱ्यांना दिल्या 'या' सूचना - कोरोना विषाणु बद्दल बातमी

भंडारा नगरपालिकाच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात एक तातडीची बैठक बोलविण्यात आली या बैठकीमध्ये उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आणि स्वतः मुख्याधिकारी तोंडाला माक्स लावलेले होते. भंडारा शहरात कोरोना चा एकही रुग्ण जरी नसला तरी भविष्यात कुठल्याही व्यक्तीपासून शहरात कोरोना व्हायरसची लागण होऊ नये यासाठी ही दक्षता घेतली जात आहे.

bhandara-city-council-all-the-employees-came-to-work-wearing-masks
भंडारा नगर परिषदचे सर्व अधिकारी कर्मचारी माक्स घालून कार्यालयात हाजर
author img

By

Published : Mar 16, 2020, 4:55 PM IST

भंडारा - करोना विषाणुचा महाराष्ट्रामध्ये शिरकाव झाल्यानंतर त्याला प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे बऱ्याच उपाय योजना केल्या जात आहेत. या विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भंडारा नगर परिषदच्या मुख्य अधिकाऱ्यांनी सुद्धा काळजी म्हणून सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना मास्क घालून कामावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. मुख्याधिकारी यांच्या आदेशाचे पालन करत सर्व अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा मास्क घालून कामावर हजर झाले. नगरपालिके तर्फे बॅनर आणि पत्रके लावून लोकांची जनजागृती करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम तयार करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले.

भंडारा नगर परिषदचे सर्व अधिकारी कर्मचारी माक्स घालून कार्यालयात हाजर

सोमवारी भंडारा नगरपालिकाच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात एक तातडीची बैठक बोलविण्यात आली या बैठकीमध्ये उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आणि स्वतः मुख्याधिकारी तोंडाला माक्स लावलेले होते. भंडारा शहरात कोरोना चा एकही रुग्ण जरी नसला तरी भविष्यात कुठल्याही व्यक्तीपासून शहरात कोरोना व्हायरसची लागण होऊ नये यासाठी ही दक्षता घेतली जात आहे. प्रादुर्भाव थांबविणे हे प्रमुख काम असल्याचे मुख्याधिकारी सांगितले. नगरपालिकेमध्ये गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येक जण वेगवेगळ्या कामानिमित्त येतो. यातला कोण कोरोनाग्रस्त रुग्ण आहे, हे कोणालाही माहित नाही, त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना स्वतःची काळजी घेण्यासाठी मास्क घालून काम करण्याचे सुचित करण्यात आले आहे.

शहरातील 16 प्रभागासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे 4 चमू बनवून शहरात मौखिक जनजागृती करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहराच्या विविध ठिकाणी बॅनर लावून आणि पत्रके वाटून सुद्धा लोकांना बचाव कसा करावा काय उपाय योजना कराव्यात या विषयीची माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मास्कचा तुटवडा झाल्यास हात रुमाला ने कसा माक्स बनवला जाऊ शकतो, याचे सुद्धा प्रात्यक्षिक यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दाखवले. जे लोक विदेशातून, दुसऱ्या राज्यातून आले असतील, कोणाच्या घरी कोणी अजारी असेल याची यादी सुद्धा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाणार आहे. पुढचे काही दिवस बायोमेट्रिक हजेरी बंद ठेवण्यात आली आहे. अशा विविध पद्धतीने या कोरोना पासून बचाव करण्याचे काम सुरू असल्याचे मुख्यधिकाऱ्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.