ETV Bharat / state

तुमसर मतदारसंघात होणार तिहेरी लढत, प्रचाराची रणधुमाळी सुरू - bhandara assembly election 2019

तुमसर विधानसभा क्षेत्राचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. या मतदारसंघात ५ पक्षाचे आणि ५ अपक्ष असे १० उमेदवार असले तरी खरी लढत ही भाजपचे प्रदीप पडोळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे आणि भाजपचे निलंबित बंडखोर आमदार अपक्ष चरण वाघमारे यांच्यात असल्याने या विधानसभा क्षेत्रात त्रिशंकू लढत पाहायला मिळणार आहे.

तुमसरमध्ये होणार त्रिकोणी लढत
author img

By

Published : Oct 11, 2019, 2:04 PM IST

Updated : Oct 11, 2019, 3:31 PM IST

भंडारा - सध्या तुमसर विधानसभा क्षेत्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. या मतदारसंघातील उमेदवारांनी गावोगावी जाऊन कॉर्नर सभा घेत प्रचाराची गती वाढवली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि अपक्ष अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. गुरुवारी भाजपचे वरिष्ठ नेते माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान सभापती तारीक कुरेशी यांनी भाजपला रामराम ठोकला. तर, विद्यमान आमदार चरण वाघमारे यांनी केलेला बंडखोरीमुळे त्यांना त्यांच्या 4 सहकाऱ्यांसह पक्षातून ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपमध्ये असलेल्या अंतर्गत वादाचा राष्ट्रवादीला फायदा होणार अशी चर्चा सध्या सुरू आहे.

तुमसरमध्ये त्रिकोणी लढत

तुमसर विधानसभा क्षेत्रात एकूण १० उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी ५ पक्षाचे तर ५ अपक्ष उमेदवार आहेत. रिंगणात जरी १० उमेदवार असले तरी खरी लढत ही भाजपचे प्रदीप पडोळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे आणि भाजपचे निलंबित बंडखोर आमदार व अपक्ष उमेदवार चरण वाघमारे यांच्यात असल्याने या विधानसभा क्षेत्रात त्रिशंकू लढत पाहायला मिळणार आहे. तुमसर मतदारसंघात 8 तारखेपासून प्रचाराला सुरुवात झाली असली तरी कोणत्याही पक्षाचा राष्ट्रीय स्टार प्रचारक आला नसल्याने सध्या उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचाराची धुरा सांभाळत आहे. असे असले तरी राष्ट्रवादीतर्फे प्रफुल्ल पटेल हे उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. तर, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रचारप्रमुख नाना पटोले सध्या त्यांच्या विधानसभा क्षेत्रात स्वतःचा प्रचार करत असून १२ तारखेनंतर ते इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभर भ्रमण करणार आहेत. या क्षेत्रात कुणबी, तेली, पवार आणि त्यानंतर अनुसूचित जाती या मतदारांची संख्या मोठी आहे. तर, प्रमुख लढत असलेले तिन्ही उमेदवार हे तेली समाजाचे आहेत. त्यामुळे कुणबी समाजाचे आणि पवार समाजाचे मतदान ज्या उमेदवाराच्या बाजूने पडतील त्याची विजयाची शक्यता तेवढीच वाढेल.

हेही वाचा - भंडारा जिल्ह्यात तिन्ही मतदारसंघात आमदारांची बंडखोरी
सध्या तीनही उमेदवार त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अग्रेसर असून तिन्ही उमेदवारांना विजयाची खात्री आहे. तर, विद्यमान आमदार वाघमारे यांनी केलेली बंडखोरी तसेच त्यांच्या ४ समर्थकांसह पक्षातून केलेले निलंबन. यासोबतच मुस्लीम चेहरा असलेले म्हाडाचे सभापती तारीक कुरेशी यांनी भाजपला केलेल्या रामराममुळे २ गटात विभागलेल्या भाजपला मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे भाजपचे हे नुकसान राष्ट्रवादीसाठी फायद्याचे ठरणार असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा - 'मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला लुटले, आमचा लढा फडणविसांविरोधातच'
एका वरिष्ठ नेत्याला असं तडकाफडकी राजीनामा द्यावा लागतो हे भाजपसाठी मोठे अपयश आहे. तारीक कुरेशी यांनी राजीनामा दिल्यामुळे मला त्याचा निश्चितच फायदा होईल, असे बंडखोर आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले. मी केलेल्या कामाचा मतदार मला नक्कीच मोबदला देतील. त्यामुळे मी निवडून येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर, या क्षेत्रातील माझे राजकीय काम आणि क्षेत्रात रोजगार, शैक्षणिकदृष्ट्या मी लोकांसाठी काम करणार आहे. तसचे संपूर्ण भाजप आमच्या पाठीशी आहे त्यामुळे मला माझ्या विजयाबद्दल अजिबात शंका नसल्याचे भाजपचे उमेदवार प्रदीप पडोळे यांनी सांगितले.

हेही वाचा - प्रचारासाठी भंडाऱ्यातील उमेदवार दसरा मैदानात!

Intro:ANC : तुमसर विधानसभा क्षेत्राचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे विधानसभा क्षेत्राचे उमेदवारांनी गावोगावी जाऊन नुक्कड सभा घेत प्रचाराची गती वाढवली आहे. या विधानसभा क्षेत्रात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी आणि अपक्ष अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. गुरुवारी भाजपाचे वरिष्ठ नेते माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान माळा सभापती यांनी भाजपला रामराम ठोकला तर विद्यमान आमदार चरण वाघमारे यांनी केलेला बंडखोरीमुळे त्यांना त्यांच्या चार सहकाऱ्यांसह पक्षात न सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. या भाजपात असलेल्या अंतर्गत वादाचा राष्ट्रवादीला फायदा होणार अशी चर्चा सध्या सुरू आहे.

Body:सकाळी नऊ वाजेपर्यंत आपल्या कार्यालयात कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर उमेदवार आपल्या प्रचाराला सुरुवात करतात त्यांच्या क्षेत्रातील वेगवेगळ्या गावी जाऊन नुक्कड सभेच्या माध्यमातून सकाळपासून तर रात्रीपर्यंत या सभा घेत मतदारांना मते मागितली जातात.
विधानसभा क्षेत्रात एकूण दहा उमेदवार रिंगणात आहेत त्यापैकी 5 पक्षाचे तर पाच अपक्ष उमेदवार आहेत रिंगणात जरी दहा उमेदवार असले तरी खरी लढत ही भाजपाचे प्रदीप पडोळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे आणि भाजपाचे निलंबित बंडखोर आमदार अपक्ष चरण वाघमारे यांच्यात असल्याने या विधानसभा क्षेत्रात त्रिशंकू लढत पाहायला मिळणार आहे.

आठ तारखेपासून प्रचाराला सुरुवात झाली असली तरी कोणत्याही पक्षाचा राष्ट्रीय स्टार प्रचारक आले नसल्यामुळे सध्या उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचाराची धुरा सांभाळत आहे असे असले तरी राष्ट्रवादीतर्फे प्रफुल पटेल हे उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत तर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रचारप्रमुख नाना पटोले सध्या त्यांच्या विधानसभा क्षेत्रात स्वतःचा प्रचार करत असून बारा तारखेनंतर ते इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभर भ्रमण करणार आहेत.
त्या निवडणुकीत जातीय समीकरण ही खूप महत्त्वाचे आहे या क्षेत्रात कुणबी तेली आणि पवार आणि त्यानंतर अनुसूचित जाती या मतदारांची संख्या मोठी आहे प्रमुख जळत असलेल्या तिन्ही उमेदवार हे तेली समाजाचे आहेत त्यामुळे कुणबी समाजाचा आणि पवार समाजाचा मतदान ज्या उमेदवाराच्या बाजूने पडतील त्याची विजयाची शक्यता तेवढीच वाढेल.
सध्या तीनही उमेदवार त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अग्रेसर असून तिन्ही उमेदवारांना विजयाची आम्ही आहे असे असले तरी विद्यमान अंधारे केलेली बंडखोरी त्यांना त्यांच्या समर्थकांसह पक्षातून केले निलंबित आणि मुस्लिम चेहरा असलेल्या म्हाडा चे सभापती तारीक कुरेशी यांचा भाजपाला केलेला रामराम त्यामुळे दोन गटात विभागलेली भाजपा याचा भाजपाला मोठे नुकसान होणार आहे तर पाच-पाच नुकसान हे राष्ट्रवादीसाठी फायद्याचे ठरणार आहे.
एका वरिष्ठ नेत्याला असं तडकाफडकी राजीनामा द्यावा लागतो हे भाजपा साठी मोठे अपयश आहे, तारीक कुरेशी त्यांनी राजीनामा दिल्यामुळे मला त्याचा निश्चितच फायदा होईल बंडखोर आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले मी केलेल्या कामाचा मतदार मला नक्कीच मोबदला देतील त्यामुळे मी निवडून येईल असेही त्यांनी सांगितले. तर या क्षेत्रातील माझे राजकीय काम आणि क्षेत्रात रोजगार, शैक्षणिक दृष्ट्या मी लोकांसाठी काम करणार आहे आणि संपूर्ण भाजप आमच्या पाठीशी आहे त्यामुळे मला माझ्या विजयाबद्दल अजिबात शंका नसल्याचे भाजपाचे उमेदवार प्रदीप पडवळ यांनी सांगितले.

Conclusion:
Last Updated : Oct 11, 2019, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.