ETV Bharat / state

गिरोला येथील स्मशानभूमीत कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची हेळसांड होत असल्याचा आरोप

जिल्ह्यामध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. गिरोला येथील स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या मृतदेहांना जाळताना कमी लाकडांचा वापर केला जातो. त्यामुळे, हे मृतदेह अर्धवट जळतात आणि मोकाट श्वान या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे अवयव तोडून गावात घेऊन येतात, असा आरोप भिलेवाडा येथील गावकऱ्यांनी केला आहे.

author img

By

Published : Apr 11, 2021, 7:57 PM IST

Updated : Apr 11, 2021, 8:25 PM IST

dead body care Giroli Cemetery News
अर्धवट जळालेले मृतदेह प्रकरण गिरोली

भंडारा - जिल्ह्यामध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. गिरोला येथील स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या मृतदेहांना जाळताना कमी लाकडांचा वापर केला जातो. त्यामुळे, हे मृतदेह अर्धवट जळतात आणि मोकाट श्वान या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे अवयव तोडून गावात घेऊन येतात, असा आरोप भिलेवाडा येथील गावकऱ्यांनी केला आहे. तर, मृतदेह नियमाप्रमाणे जाळण्यात येतात. लाकडांचा साठाही मोठ्या प्रमाणात आहे, असे भंडारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांनी सांगितले.

माहिती देताना सरन रचनारे, भिलेवाडाचे उपसरपंच आणि भंडारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी

हेही वाचा - नवेगाव नागझिरा आग दुर्घटनेतील वन मजूरांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर

वर्षभरापहिले बनविलेल्या गिरोला स्मशानघाटात सुविधांचा अजूनही अभाव आहे. तर, या ठिकाणी शव दाहीका लावण्याचा प्रस्ताव वर्षभरानंतरही तसाच पडून आहे. आणि सध्या कोरोना रुग्णांची मृत्यूसंख्या वाढल्याने अशी परिस्थिती निर्माण होत आहे.

दररोज सरासरी 20 रुग्णांना जाळले जाते

सध्या भंडारात दररोज कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. भंडारा जिल्हा आणि इतर जिल्ह्यातील उपचार घेणाऱ्या जवळपास 20 कोरोनाबाधितांचा दररोज मृत्यू होत आहे. दररोज 20 लोकांचे मृतदेह जाळण्याचे काम भंडारा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. गिरोला येथे नव्याने स्थापन केलेल्या पुनर्वसन भागात कोरोनाचे मृतदेह जाळण्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे. मात्र, या ठिकाणी सुविधांचा वनवा आहे. सायंकाळी सातनंतर तिथे साधी लाईटची व्यवस्था नसल्याने काळोख अंधार होतो. त्यामुळे, सायंकाळी सात नंतर इथे कधीही कोणताही कर्मचारी थांबत नाही.

लाकडे कमी वापरल्याने मृतदेह अर्धवट जळत असल्याचा आरोप

दररोज सरासरी 20 मृतदेह जाळले जात असल्याने सायंकाळपर्यंत हे मृतदेह जळत असतात. मात्र, अंधार झाल्यावर कर्मचारी तिथून निघून गेल्यानंतर ते मृतदेह किती जळले आणि किती नाही, याची कोणालाही कल्पना नसते. अशाच अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या शरीराचे अवयव भिलेवाडा गावात दिसल्यावर गावात एकच खळबळ उडाली. मृतदेह जाळताना लाकडांचा कमी वापर होतो, त्यामुळे हे मृतदेह अर्धवट जळतात आणि मोकाट श्वान या मृतदेहाचे लचके तोडून त्यांचे अवयव गावात आणतात, असा आरोप भिलेवाडाचे उपसरपंच विनोद बांते यांनी केला. तशी तक्रारसुद्धा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे.

कर्मचाऱ्यांनी अवयव मिळाल्याचे केले मान्य

मानवी अवयव सापडल्याबाबत उपसरपंचाने फोनद्वारे माहिती दिल्यावर भंडारा नगर परिषदेच्या लोकांनी श्वानाने आणलेले अवयव जमा करत परत स्मशानभूमीमध्ये नेऊन जाळल्याची माहिती सरन रचनाऱ्या कर्मचाऱ्याने दिली आहे. तर, भंडारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या मते कोरोना मृतकांच्या मृतदेहावर कोरोनाच्या नियमाप्रमाणे अंत्यविधी होते. यासाठी 6 लोक हे सरन रचण्यासाठी, चार लोक हे अग्नी देण्यासाठी आणि चार लोक हे मृतदेह आणण्यासाठी ठेवलेले आहे. तसेच, जवळपास पाच ट्रक लाकूड, डिजल सर्वांची व्यवस्था मोठ्या प्रमाणात असल्याने कमी लाकडांवर मृतदेह जाळण्याचा प्रकार होत नाही. मृतदेहाचा अपमान होईल, अशी कोणतीही घटना झाली नाही. मिळालेल्या तक्रारीनुसार यापुढे अशी घटना होऊ नये म्हणून स्मशान घाटावर रात्रीला गार्ड ठेवले जाणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले.

शवदाहिनी हा योग्य पर्याय

भंडारा जिल्हा हा सध्या महाराष्ट्रातला कोरोना हॉटस्पॉट जिल्हा आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे मृतदेह जळणाऱ्यांवर मोठा ताण निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून वर्षभरापासून रखडत पडलेला शवदाहिनीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करून शवदाहिनी स्मशानभूमीवर बसवल्यास, अशा पद्धतीची घटना पुढे होण्याची शक्यता पूर्णपणे संपुष्टात येईल.

हेही वाचा - भंडाऱ्यात व्यापाऱ्यारी उतरले रस्त्यावर; लॉकडाऊन परत घेण्याची मागणी

Last Updated : Apr 11, 2021, 8:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.