ETV Bharat / state

वैद्यकीय तपासणीसाठी आणलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार - bhandara civil hospital

वैद्यकीय तपासणीसाठी भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात आणलेला गोंदियाचे आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले आहेत. या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

bhandara civil hospital
जिल्हा रुग्णालय भंडारा
author img

By

Published : Dec 3, 2019, 4:10 PM IST

भंडारा - वैद्यकीय तपासणीसाठी भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात आणलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

वैद्यकीय तपासणीसाठी आणलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

हेही वाचा - फुल्ल ढोसून झोपले तळीराम गुरुजी; विद्यार्थ्यांची पाटी राहिली कोरी

गोंदिया जिल्ह्यातील कुऱ्हाडी गावात राहणारा आरोपी दिगंबर धनलाल लांजेवाराची (40 वर्षे) गोंदिया सत्र न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी भंडारा कारागृहात करण्यात आली. कारागृहात नेण्यापूर्वी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय तपासणी आटपून या आरोपीला कारागृहाकडे नेत असताना आरोपीची हातकडी सैल होती. नेमका याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने हातकडीमधून हात अलगद बाहेर काढून धूम ठोकली. आरोपी फरार झाला त्यावेळेस परिसरात अंधार होता आणि त्याचाच फायदा घेत त्याने तेथून पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला तसेच शहरात याचा शोध घेतला. मात्र, दिगंबर लांजेवार हा आरोपी कुठेही मिळाला नाही शेवटी गोंदिया पोलिसांनी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा - थर्डक्लास पक्षात जाऊन कारकीर्द संपवायची नाही; विश्वजीत राणेंचा सेनेवर घणाघात

Intro:या बातमी मधील काही माहिती आणि व्हिडिओ आणि बाईट गोंदिया वरून रवी सपाटे पाठवीत आहे दोन्ही बातमी एकत्रित लावावी.

anc : वैद्यकीय तपासणीसाठी भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात आणलेला गोंदियाच्या आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याची घटना भंडारा येथे घडली आहे या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Body:गोंदिया जिल्ह्यातील कुऱ्हाडी गावात राहणारा 40 वर्षीय आरोपी दिगंबर धनलाल लांजेवार याला गोंदिया सत्र न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी भंडारा कारागृहात करण्यात आली कारागृहात नेण्यापूर्वी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले वैद्यकीय तपासणी आटपून या आरोपीला कारागृहा कडे नेत असताना आरोपीची हातकडी हीच सैल होती नेमका याच गोष्टीचा फायदा घेत आरोपी दिगंबर लांजेवार यांनी हातकडी मधून आपला हात अलगद बाहेर काढून धूम ठोकली आरोपी फरार झाला त्यावेळेस परिसरात अंधार होता आणि त्याचाच फायदा घेत त्यांनी तिथून पळ काढला पोलिसांनी त्याचा पाठलाग केला संपूर्ण शहरात याचा शोध घेतला मात्र दिगंबर लांजेवार हा आरोपो कुठेही मिळाला नाही शेवटी गोंदिया पोलिसांनी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.