ETV Bharat / state

भंडाऱ्यात रस्त्यांवरील खड्डयांमुळे ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून अपघात - Accident overturning tractor trolley due to potholes

खाम तलाव चौक ते शितलामाता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या खराब रस्त्यामुळे शितलामाता मंदिर रस्त्यावर तांदळाच्या पोत्यांनी भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली.

Accident overturning tractor trolley due to potholes
भंडाऱ्यात रस्त्यांवरील खड्डयांमुळे ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून अपघात
author img

By

Published : Nov 29, 2019, 2:45 PM IST

भंडारा - खाम तलाव चौक ते शितलामाता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तांदळाच्या पोत्यांनी भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रक्टरच्या आसपास कोणी व्यक्ती नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

भंडाऱ्यात रस्त्यांवरील खड्डयांमुळे ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून अपघात

हेही वाचा - धक्कादायक! नगरपरिषद कर्मचाऱ्याला करावे लागते नगरसेविकेचे घरगडी म्हणून काम

खाम तलाव चौक ते शितलामाता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या खराब रस्त्यामुळे शितलामाता मंदिर रस्त्यावर तांदळाच्या पोत्यांनी भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. मात्र, ट्रॉलीवर कोणीही व्यक्ती बसला नसल्यामुळे आणि ट्रॉलीच्या बाजूने कुठलेही वाहन किंवा पायी जाणारा व्यक्ती नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, २ जखमी

जिल्हा परिषद चौक ते रामटेक तालुकापर्यंत राष्ट्रीय महामार्ग बांधला आहे. मात्र, या मार्गातील खात रस्ता रेल्वेलाईन जवळून शितलामाता मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काम मागील दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यातच या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रत्येक वेळेस जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे येथे सतत लहान-मोठे अपघात होत असतात. या रस्त्याचे काम का बंद आहे, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही.

Intro:Body:Anc : खाम तलाव चौक ते शीतला माता मंदिर कडे जाणाऱ्या रोडची अक्षरशः चाळण झालेली आहे या खराब रस्त्यामुळे शितला मता मंदिर रोड वर धानाच्या पोत्याने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली मात्र ट्रॉलीवर कोणीही बसला नसल्यामुळे किंवा ट्रॉलीच्या बाजूने कुठलेही वाहन किंवा पायी जाणारा व्यक्ती नसल्याने जीवित हानी झाली नाही एवढी एक चांगली गोष्ट यानिमित्ताने घडली अन्यथा एक मोठी दुर्घटना झाली असती.
जिल्हा परिषद चौक ते रामटेक तालुका पर्यंत राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती झाली आहे मात्र या मार्गातील खात रोड रेल्वे लाईन जवळून शितलामाता मंदिर पर्यंतचा बांधकाम मागच्या दोन महिन्यापासून थांबलेला आहे त्यातच या रस्त्यांवर मोठे खड्डे पडलेले आहेत रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रत्येक वेळेस जीव मुठीत घेऊन वाहतूक करावी लागत आहे त्यामुळे येथे सतत लहान-मोठे अपघात होत असतात मात्र तरीही हा रोड बनवण्याचं का थांबलेला आहे या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही.
शुक्रवारी याच रस्त्याने धानाचे पोते भरलेला ट्रॅक्टर मार्ग काढत जात असताना ट्रॅक्टरची ट्रॉली अचानक उलटली ट्रॉलीवर मजूर नसल्याने आणि शेजारून जाणारी कुठलीही दुचाकी किंवा पादचारी नसल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही या घटनेनंतर तरी अधिकारी जागे होतील आणि हा बंद पडलेला काम आता तरी शीघ्र सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.