भंडारा - जिल्ह्याच्या तुमसर शहरातील बाजारपेठेत असलेल्या राजेश असुदानी यांच्या हरिओम ट्रेड्स या किराणा दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. मध्यरात्री 2 च्या सुमारास ही आग लागली. चार अग्निशामक गाड्यांच्या माध्यमातून ही आग विझविण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. 90 टक्के आग विझली असली तरी दोन मजली असलेल्या इमारतीच्या आतमध्ये काही ठिकाणी आग अजूनही धगधगत आहे.
तुमसर येथील किराणा दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
हे किरणाचे होलसेल दुकान असल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात किराणा माल भरलेला होता. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुकानाच्या शेजारी इतरही दुकानं आणि रहिवासी घर आहेत.
आग
भंडारा - जिल्ह्याच्या तुमसर शहरातील बाजारपेठेत असलेल्या राजेश असुदानी यांच्या हरिओम ट्रेड्स या किराणा दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. मध्यरात्री 2 च्या सुमारास ही आग लागली. चार अग्निशामक गाड्यांच्या माध्यमातून ही आग विझविण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. 90 टक्के आग विझली असली तरी दोन मजली असलेल्या इमारतीच्या आतमध्ये काही ठिकाणी आग अजूनही धगधगत आहे.
Last Updated : Jun 11, 2021, 2:00 PM IST