भंडारा - गोसे धरणाचे 33 पैकी 7 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. या पावसाळ्यात पहिल्यांदाच धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 767 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गोसे धरणाची सध्याची जलाशय पातळी 243.500 मीटर आहे. एकूण प्रकल्पाचा पाणीसाठा 1146.08 तर जिवंत उपयुक्त पाणीसाठा 740.17 दलघमी एवढा आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा 360.5 दलघमी आहे. तर आजच्या पावसाची टक्केवारी 8.00 मीटर आहे. मागील वर्षी याच तारखेला उपयुक्त पाणी साठा 3.42 दलघमी ज्याची टक्केवारी 0.46 एवढी होती. येत्या दोन दिवसांत आणखी पाऊस झाल्यास 243.5 मीटरची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी गरजेनुसार दारं उघडण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.