ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्यात गेल्या 12 तासात कोरोनाच्या तीन नवीन रुग्णांची नोंद, आकडा 12 वर - bhandara corona news

जिल्ह्यात गेल्या 12 तासात कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 12 झाली असून एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे, जिल्ह्यात अकरा रुग्णांवर कोरोनाच्या विशेष रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिली.

भंडारा जिल्ह्यात गेल्या 12 तासात कोरोनाच्या तीन नवीन रुग्णांची नोंद

author img

By

Published : May 24, 2020, 4:18 PM IST

भंडारा - जिल्ह्यात 12 तासात पुन्हा 3 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन आकडा 12 वर पोहोचला आहे. या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये साकोली, लाखांदूर व पवनी तालुक्यात लोकांचा समावेश आहे. आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 12 झाली असून एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे, जिल्ह्यात अकरा रुग्णांवर कोरोनाच्या विशेष रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिली.

तसेच होम क्वारंटाईन केलेल्या लोकांनी बाहेर फिरून दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालू नये. कारण, तो व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्यास त्याच्यामुळे संपूर्ण परिसर कंटेंनमेंट झोनमध्ये जाईल. जे त्या परिसरातील लोकांसाठी विशेषतः ग्रामीण लोकांसाठी आर्थिक दृष्टीने धोक्याचे होईल. त्यामुळे होम क्वारंटाईन असलेल्या लोकांनी घरीच थांबावे, अशी विनंती त्यांनी बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला केली आहे.

भंडारा जिल्ह्यात गेल्या 12 तासात कोरोनाच्या तीन नवीन रुग्णांची नोंद

जिल्ह्यात नव्याने मिळालेल्या रुग्णांमध्ये लाखांदूर तालुक्यातील 29 वर्षीय व्यक्तीचा समावेश असून हा तरुण 15 तारखेला पुण्यावरून मिनी बसने लाखांदूरला आला होता. त्याला होम क्वारंटाईन केले गेले होते. 20 तारखेला त्याला ताप आणि सर्दीची लक्षणे दिसताच त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा 23 तारखेला पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्याचा संपर्कातील 4 लोक अति धोकादायक म्हणून तर 26 कमी धोकादायक म्हणून क्वारंटाईन केले गेले आहे. तर, दुसरा रुग्ण हा पवनी तालुक्यातील भुयार येथील रहिवासी असून 18 तारखेला तो मुंबईच्या नेरुळवरून लाखांदूरला पोहोचला होता. तो ज्या ट्रकमधून आला त्या ट्रकमध्ये 25 लोक होते. 19 तारखेला त्याचे स्वॅब तपासणीकरता पाठविण्यात आले होते. तर, 23 ला तो कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा रुग्ण इन्स्टिट्यूट क्वारंटाईन होता. त्यामुळे, त्याच्या संपर्कातील 4 अति धोकादायक आणि 13 कमी धोकादायक लोकांना क्वारंटाईन केले गेले आहे.

तर, तिसरा रुग्ण हा साकोली तालुक्यातील असून या अगोदर मिळालेल्या 4 कोरोनाबाधित रुग्णांचा तो साथीदार आहे. या नव्याने मिळालेल्या रुग्णामुळे भंडारा जिल्ह्याची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 12 झाली असून यापैकी एक रुग्ण बरा झाला आहे. तर, उर्वरित 11 लोकांवर कोरोनाच्या विशेष रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी सांगितले आहे.

तसेच, बाहेरून येणाऱ्या लोकं ज्यांना होम क्वारंटाईन केले जात आहे. त्यांनी घरीच राहावे, त्यांच्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल. तसेच ते जर पॉझिटिव्ह निघाले तर त्यांचे गाव कंटेंनमेंट झोनमध्ये जाईल. त्यामुळे संपूर्ण गावचे मोठे आर्थिक नुकसान होईल, आणि 28 दिवस त्या परिसरातील सर्व आर्थिक व्यवहार बंद होतील. रोजगार हमीची कामे बंद होतील. हे न परवडणारे आहे, म्हणून ज्याला होम क्वारंटाईन केले गेले त्यांनी पुढच्या 28 दिवस घरीचं राहावे, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.