ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्यात 'बर्ड-फ्लू'चा शिरकाव? २४ कोंबड्या आढळल्या मृतावस्थेत - बर्ड फ्लू भंडारा

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. आज भंडारा जिल्ह्यातही याचा प्रादुर्भाव दिसून आला. लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे धनंजय भुसारी यांच्या कुक्कुटपालन केंद्रातील 300 पैकी 24 कोंबड्या आज मृतावस्थेत आढळून आल्या.

भंडारा
भंडारा
author img

By

Published : Jan 12, 2021, 10:13 PM IST

भंडारा - राज्यात वाढत असलेला 'बर्ड फ्लू'चा प्रभाव आता भंडारा जिल्ह्यात दिसू लागला आहे. जिल्ह्यातील पालांदूर येथील एका कुक्कुट पालन केंद्रातील चोवीस कोंबड्या मृतावस्थेत आढळल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले असून तोपर्यंत प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पालांदूर गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. आज भंडारा जिल्ह्यातही याचा प्रादुर्भाव दिसून आला. लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे धनंजय भुसारी यांच्या कुक्कुटपालन केंद्रातील 300 पैकी 24 कोंबड्या आज मृतावस्थेत आढळून आल्या. याची माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला मिळाल्यानंतर कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेऊन प्रादेशिक रोग अन्वेषण प्रयोगशाळा नागपूरच्या मार्फत पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे समजते. दरम्यान, याची माहिती पशुसंवर्धन विभागाने यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल येईपर्यंत या कुक्कुटपालन केंद्रातून खरेदी विक्रीवर प्रतिबंध टाकले आहेत.

गाव प्रतिबंध क्षेत्र घोषित

या केंद्रातील पक्षी इतर पक्ष्यांच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घेण्यात यावी, केंद्रातील कर्मचारी, संचालक आणि संपर्कात आलेले नातेवाईक यांना 14 दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात यावे, पालांदूर गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे आणि आवागमन बंद करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

कोरोनानंतर पुन्हा मोठे नुकसान होण्याची शक्यता

या प्रकारामुळे आता भंडारा जिल्ह्यातील कुक्कुटपालन व्यवसायामध्ये आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. बरेच कुक्कुटपालन केंद्र बंद झाले होते तर जे कुक्कुटपालन केंद्र सुरू होते, ते टप्प्याटप्प्याने स्थिरावत असताना या बर्ड फ्लूमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट येण्याची शक्यता वाढली असल्याने या व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पशुसंवर्धन विभागाने 6 लोकांचे पथक केले तयार

या आजाराच्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाने प्रत्येक तालुक्यासाठी सहा लोकांचा समावेश असलेले एक पथक तयार केले असल्याची माहितीही पशुसंवर्धन विभागाचे पशुधन विकास अधिकारी डॉ. सुशील भगत यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.