भंडारा - सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वार्डात भरती असलेल्या रुग्णापैकी 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासनात खडबळ उडाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मते या दोन्ही रुग्णांचा मृत्यू वेगवेगळ्या रोगांमुळे झाला आहे. या दोन्ही रुग्णांचा घशाचे स्वॅब हे तसणीसाठी पाठविले आहेत. अहवाल आल्यानंतरच हे कोरोना बाधित होते की नाही हे सांगता येईल. तोपर्यंत कोणीही अफवा पसरवू नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना स्पेशल आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहे. यात कालच्या आकड्यानुसार एकूण 21 रुग्ण भरती होते. काल रात्री 10 च्या दरम्यान एका रुग्णचा मृत्यू झाला आहे. तर रात्री 1 वाजताच्या दरम्यान दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने रुग्णालयात एकच खडबळ उडाली आहे. हे दोन्ही रुग्ण 50 ते 70 च्या वयातील असून 70 वर्षीय रुग्ण हा तुमसर तालुक्यात खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्याला मधुमेह होता आणि त्याला पुढील उपचारासाठी 16 तारखेला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले होते. 17 तारखेला शरिरातील विविध अवयव काम करणे बंद झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरा रुग्ण हा गोपीवाडा येथील 70 वर्षीय रुग्ण असून हा देखील खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. इथून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. याला हायपरटेंशन आणि न्यूमोनिया सारखे आजार होते. सोबत लंग्स कॅन्सरदेखील असल्याची माहिती पुढे येत आहे. हे दोन्ही रुग्ण आयसोलेशन वॉर्डात भरती असल्याने त्यांचे घशाचे नमुने नागपुरला पाठविण्यात आले आहेत. कोरोनाचे अहवाल आल्यानंतरच ते कोरोना बाधित होते की नाही हे स्पष्ट होईल. तो पर्यंत कोणीही कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला अशी अफवा पसरवू नये, असे आव्हान जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद खंडाते यांनी नागरिकांना केले आहे.